👁 11 Views

बिलोली तालुका बनला अवैध धंद्याचे माहेर घर.

  • 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 23 september  2017 

बिलोली – वैभव घाटे
बिलोली तालुक्यातील गंजगाव परिसरामध्ये अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. गंजगाव परिसरामध्ये विना परवाना देशी दारु मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. या सर्व अवैध धंदे करणारांवर संबधित अधिकार्‍यांनी तात्काळ कठोर पावले उचलून गंजगाव परिसर अवैध धंदे मुक्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 


गंजगाव माचनुर या गावामध्ये देशी दारु विक्रीचा परवाना कोणत्याही विक्रेत्याकडे नाही. तरीसुध्दा खुलेआमपणे दारु विक्रीचा व्यवसाय जोमात चालु आहे. बिलोली तालुक्यात हातपंपाना कमी पाणी येत असेल पण तालुक्यात अवैधरित्या विक्री होणार्‍या ‘दारुचे पाट’ वाहताना दिसत आहेत. यांचा सर्वात वाईट परिणाम गावातील तरुण वर्गावर होत आहे. तसेच गावातील महिलांनाही नाहकपणे याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे . गल्लोगल्ली मोठ्या प्रमाणात अशा धंद्यांना ऊत आल्याने गावातील शांतता लोप पावत आहे. या दारुड्या लोकांमुळे गल्लो गल्लीत गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याने त्याचा बालकांच्या मनावर विपरित परिणाम होत आहे. 


या गोष्टींकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग ‘अर्थपुर्ण’ दुर्लक्ष करित असल्याचेच यातून स्पष्टपणे जाणवत आहे. वरिष्ठांनीच आता याकडे लक्ष घालून हे धंदे बंद करावेत. संबंधीत विभागाचे अधिकार्‍यांनी याची दखल परिसरातील सर्व ठिकाणची अवैध दारु विक्री बंद करुन गावात सुख शांती नांदेल या दृष्टीने प्रयत्न करावेत. अशी मागणी गावकर्‍यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यमातून केली आहे. लवकरात लवकर हे अवैध धंदे बंद झाले नाहीत तर गावकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *