पंढरपूर लाईव्ह व सा. झंझावात च्या सर्व वाचक, हितचिंतक, जाहिरातदार बंधु-भगिणींना दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
सर्व बौध्द बंधु भगिणींना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
- 12 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 30 september 2017
भावसार यांचे आवाहन : मुद्रा लाभार्थ्यांना कर्ज मंजूरी पत्रवितरण
सोलापूर दि. 28 :- प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्या आणि उद्योजक, व्यावसायिक व्हा, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत भावसार यांनी येथे केले.
प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि स्टँण्ड अप इंडिया योजनांचा प्रचार आणि लाभार्थ्यांना कर्ज मंजूरी पत्र वाटप असा कार्यक्रम बँक ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आला होता. येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात श्री. भावसार बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते, बँक ऑफ इंडियाचे विभागीय उपव्यवस्थापक सोमशेखर, अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते.
श्री. भावसार म्हणाले, देशातील उद्योगाला चालना मिळावी, जास्तीत जास्त उद्योजक घडावेत यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेचा लाभ घेऊन अनेक उद्योजक घडले. यामुळे बेरोजगारी कमी होईल. त्यामूळे उद्योग करण्यास उत्सुक असणा-या तरुण – तरुणींनी या योजनेचा लाभ घ्यावा.
श्री. यशवंते म्हणाले, मुद्रा योजनेतून अनेक उद्योजक घडत आहेत. राज्य शासनाच्या अनेक योजना बँकामार्फत राबवल्या जातात. बँकाकडे प्रकरण सादर करताना उत्तमरित्या प्रकल्प अहवाल सादर करावा. जो उद्योग करायचा त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. उद्येाग सुरु करण्यापूर्वी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे.
यावेळी सुमारे अठरा लाभार्थ्यांना मुद्रा आणि स्टँड अप इंडिया योजनेतून मंजूर झालेल्या कर्जाचे मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले. आरसेटीचे व्यवस्थापक अशोक कणगी यांनी आरसेटी मार्फत चालवल्या जाणा-या प्रशिक्षण शिबीराबाबत माहिती दिली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

