👁 7 Views

Solapur : आमदार प्रणिती शिंदे यांची राजस्व नगर भागातील नागरिकांशी संवाद..


सोलापूर :  श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आशिया खंडातील सर्वात मोठी शासकीय वसाहत म्हणून ओळखली जाणारी राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


महाप्रसाद साठी आमदार प्रणिती शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. वसाहतीतील समस्या विषयी महिला मंडळ, पुरुष आणि युवकांशी मोकळेपणाने आमदार शिंदे यांनी संवाद साधला. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने नव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन आमदार शिंदे यांनी यावेळी केले. 


प्रणिती शिंदे यांचा सत्कार राजस्व नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नविन चेअरमन सौ. अंजली जाधव यांनी केले. मागील दहा वर्षापासून स्वामींच्या प्रकट दिनी निस्वार्थ भावनेने महाप्रसादाचे वाटप करणारे चोपडे परिवार यांचे आमदार शिंदे यांनी यावेळी कौतुक केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी परिश्रम घेतले. 


महाप्रसाद कार्यक्रमासाठी महिला/पुरुष सभासद सह युवा नेता त्रिमूर्ती प्रदीप वानखेडे, संतोष बोडके, मनमोहन चोपडे व आकाश कोळी, रवी मोहिते, सूरज साबळे, कटकधोंड यांच्यासह शेकडो भक्तगण उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *