👁 11 Views

बैलगाडा शर्यत सुरु करा या मागणीसाठी उद्या सातार्‍यात आंदोलन..!

पंढरपूर Live च्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना व आमच्या हितचिंतक मित्रपरिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! ही दिपावली तुम्हा सर्वांना सुख-शांती-समृध्दी व आरोग्यदायी व भरभराटीची जावो हीच श्रीविठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना..!
  • 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 15 October 2017


 

उद्या सोमवार दि. 16 /10/2017 रोजी बैलगाडा शर्यत सुरु करा! या मागणीसाठी सातारा येथे शेतकरी, बैलगाडा मालक यांचेवतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.  बारामती, फलटण, पुरंदर या तीन तालुक्यातील सुमारे 250 ते 350 बैल जोड्या  व सुमारे 600 ते 700 फोर व्हीलर गाड्या सातारच्या बेमुदत उपोषण आंदोलनात सहभाग घेणार आहेत.


महाराष्ट्रातील तमाम सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली,पुणे, जिल्ह्यातील शेतकरी बांधव, मुंबई बैलगाडी मालकाना, गाडी चालकांना, बैल प्रेमीना व सर्व शेतकर्‍यांना आवाहन करण्यात आले आहे की, घराबाहेर निघा. ही लढाई आपण सर्वांनी मिळून एका ताकदीने जिंकण्याची आहे. आम्ही बैलगाडा शर्यतीसाठी मोठया कष्टाने खोंड सांभाळायची, वाढवायची अन् मुठभर प्राणीमित्र संघटनानी बैलगाडा शर्यतीस विरोध करायचा. हे आम्हाला मान्य नाही. आम्ही शेतकरी बैलावर जेवढा जीव लावतो तसा जीव कोणीच प्राणीमित्र लावत नसतील. आमच्या बैलांवर आमचा आमच्या प्राणापेक्षा जीव असतो. पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधव, बैलगाडा चालक, मालक यांना आवाहन करतो की, बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठीच्या आमच्या आंदोलनाला साथ द्या, सहभागी व्हा, आपापल्या भागात यासाठी आंदोलने करा. असे मनोगत चाकण येथील योगेश पांढरे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना व्यक्क्त केले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *