👁 9 Views

ऊसाने भरुन चाललेले ‘लोकनेते’ चे ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी कुरुल येथे अडविले, कामती पोलीस ठाण्याचे सपोनि बल्लाळ यांच्या मध्यस्थीनंतर लगेचच ट्रॅक्टर लोकनेते कारखान्याकडे रवाना

पंढरपूर Live 29 October 2017

ऊसाने भरुन चाललेले ‘लोकनेते’ चे ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी कुरुल येथे अडविले, कामती पोलीस ठाण्याचे सपोनि बल्लाळ यांच्या मध्यस्थीनंतर लगेचच ट्रॅक्टर लोकनेते कारखान्याकडे रवाना
मोहोळ(तालुका प्रतिनिधी)
ऊसाला जोपर्यंत दर जाहीर करत नाही तोपर्यंत गावातील ऊसाला कोयता लावु द्यायचा नाही आणि बाहेरगावचा ऊस कुरुलमधुन जावु द्यायचा नाही असा ठराव कुरुलच्या शेतकऱ्यांनी केला असुन देखील दि २९ रोजी दुपारच्या दरम्यान सोहाळे येथील दोन व वरकुटे येथील एक असे ऊसाचे लोकनेते कारखान्याकडे जाणारे तीन ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी अडविल्याने कुरुल चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र कामती पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि घनश्याम बल्लाळ यांच्या यशस्वी मध्यस्थीने शेतकऱ्यांनी अडविलेले ट्रॅक्टर सोडून दिले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या जिल्हाभरात ऊसाची अंदोलने सुरु आहेत. यंदा ऊसाला ३ हजार ५०० रुपये दर द्या अशी मागणी शेतकरी आणि संघटनांनी केली आहे. शिवाय दर जाहीर करा मगच आमच्या ऊसाला कोयता लावा असा पवित्रा सध्या शेतकऱ्यांनी ऊचलला असुन या क्रांतिकारी लढ्याची ठिणगी मोहोळ तालुक्यातील औंढी व कुरुल येथे पडली. ऊसाला कोयता लावायचा नाहीच पण आमच्या गावातुन ऊसाने भरलेला ट्रॅक्टर जावु देणार नाही असा ठरावच शेतकऱ्यांनी घेतला असतानाच वरकुटे आणि सोहाळे येथील शेतकऱ्यांनी ऊसाला तोड दिली आणि हे ट्रॅक्टर कुरुल येथुन लोकनेते कारखान्याकडे निघाले होते. याचवेळी कुरुल येथे शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टर चालकांना अडवुन ट्रॅक्टर थांबविले. यानंतर लोकनेतेचे प्रशासन घटनास्थळी आले मात्र ते कोणताच तोडगा काढु शकले नाही. दरम्यान याचवेळी कामती पोलीस स्टेशनचे स.पो.नि.घनश्याम बलाळ यांनी घटनास्थळी भेट देवुन एवढे तीन ट्रॅक्टर जावु देण्याची विनंती शेतकऱ्यांना केली आणि बल्लाळ यांच्या विनंतीनंतर हे ट्रॅक्टर लोकनेते कारखान्याकडे रवाना झाले.
मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *