👁 9 Views

स्वेरीत विद्यार्थी दिन साजरा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे.

                 -महाराष्ट्र राज्य पालक महासंघाचे अध्यक्ष आबासाहेब दैठणकर

पंढरपूर Live 8 NOVEMBER 2017
पंढरपूर- ‘भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी सातारा येथे छत्रपती प्रतापसिंह महाराज शाळेत प्रवेश घेतला आणि पुढे घटनाकार बनून त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी भारतीय राज्यघटना लिहली. डॉ. बाबासाहेबांनी समाजासाठी संघर्ष करत महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षणाचा आदर्श समोर ठेवून बालदशेतच शैक्षणिक प्रेरणा घेत, अखेरपर्यंत विद्यार्थी दशेत राहून समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षित करण्याचे कार्य केले. डॉ. आंबेडकरांनी मानवतेची पूजा करतच संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी व उपेक्षित असलेले विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे असा विचार करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाला सुरवात केली होती. प्रचंड मेहनतीच्या बळावरच त्यांनी परदेशात देखील उच्च शिक्षण घेतले.  अशा भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे उच्च विचार, प्रचंड मेहनत  व ज्ञान साधना ही विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पालक महासंघाचे अध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी केले.
           गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आज ‘विद्यार्थी दिन’ साजरा झाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केलेले पालक महासंघाचे अध्यक्ष दैठणकर हे भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या कार्य कर्तुत्वाच्या विचारांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे पालक महासंघाचे अध्यक्ष दैठणकर व विद्यार्थी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
 पोर्णिमा कुलकर्णी, अश्विनी पाटील, स्नेहल शिंदे व ओंकार गोरे या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व एम.बी.ए च्या विद्यार्थी प्रतिनिधींनी शिक्षणाविषयी व स्वेरीत मिळणाऱ्या शिक्षणाच्या सुख-सोयीबद्दल मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण पद्धतीवर व संघर्षात्मक जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या शिक्षणामुळे झालेला सामाजिक व शैक्षणिक बदल याविषयी विचार मांडले. यावेळी अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. मधील विद्यार्थी, उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी यांनी मानले.

13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर


 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *