इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 12 नोव्हेबर रोजी
पंढरपूर Live 9 NOVEMBER 2017
सोलापूर दि.9 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत इयत्ता 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) 12 नोव्हेंबर 2017 रोजी राज्यातील 248 केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी राज्यातील 5 हजार 618 शाळामधील 68 हजार 778 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. संबंधित शाळांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे जिल्हा परिषदेच्या www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam .in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
प्रवेशपत्रके विद्यार्थ्यास देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्रावर संबंधित मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावयाची आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रचालक, शिक्षणाधिकारी (माध्य.) किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 1 यांच्याकडे 020 – 26123066 / 020 – 26123067 या क्रमांकारवर संपर्क साधावा,असे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



