पंढरपूर Live 23 NOVEMBER 2017
सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरूवार) दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोडनिंबनजीक घडली. मृत दाम्पत्य हे पुण्यातील दापोडी परिसरातील असल्याचे सांगण्यात येते.
अधिक माहिती अशी की, संजय गायकवाड आणि रेणूका गायकवाड (रा. दापोडी, पुणे. मुळगांव. हंगरगा, जि. उस्मानाबाद) यांची फॉर्च्युनर (एमएच १४ इआर ०९२८) कार भरधाव वेगाने सोलापूरहून पुण्याकडे जात होती. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने मोडनिंबनजीक पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत फॉर्च्युनरमधील गायकवाड दाम्पत्य जबर जखमी होऊन जागीच मृत पावले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





