👁 12 Views

संकेत अटकळे खुन प्रकरणी तत्कालीन पो. नि. दिलीप जाधवसह चार कर्मचार्‍यांवर कारवाई

संकेत अटकळे खुन प्रकरणी तत्कालीन पो. नि. दिलीप जाधवसह चार कर्मचार्‍यांवर कारवाई 


पंढरपूर Live 25 NOVEMBER 2017

संकेत आटकळे खून प्रकरण  तपास व्यवस्थित न करीत आरोपींना सहकार्य केल्याचा ठपका 
पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह चार कर्मचाºयांवर राज्याचे पोलीस महासंचालक विभागाने कारवाई करीत वेतनवाढ रोखली आहे. सन २०१३ साली झालेल्या शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथील पाच वर्षीय संकेत आटकळे खून प्रकरणाचा तपास व्यवस्थित न करता आरोपींना सहकार्य केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. चक्क राज्याच्या पोलीस महासंचालक विभागाकडून कारवाई झाल्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 
सन २०१३ साली पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील पाच वर्षीय संकेत आटकळे या बालकाचे अपहरण करून खून करण्यात आला होता. त्यावेळी हे प्रकरण राज्यभर गाजले होते. मात्र तालुका पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली नव्हती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील व कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक चव्हाण यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यानंतर एक महिन्यांनी आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित न करता आर्थिक हितसंबंध जोपासत आरोपींना सहकार्य केल्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली होती. तब्बल चार वर्षे याबाबत सुनावण्या होऊन पोलीस प्रशासनाने चौकशी करीत यामध्ये दोषी आढळल्याने पो. नि. दिलीप जाधव, तत्कालीन सपोनि राजेंद्र मस्के, पोहेकॉ. वाघमोडे, मोमिन, माने यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे.
या प्रकरणाचा तपास व्यवस्थित न केल्यामुळे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी तालुका पोलिसांचा कसुरी अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठविला होता. यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशाने करमाळ्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील यांनी प्राथमिक चौकशी केली होती. या चौकशीत पो. नि. दिलीप जाधवसह चार कर्मचारी दोषी आढळल्याने राज्याचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या आदेशाने या कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. ही विभागीय चौकशी तत्कालीन होम डीवायएसपी दिलीप चौगुले यांनी करून जानेवारी महिन्यामध्ये या कर्मचाºयांचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयास सादर केला होता. यावर पोलीस महासंचालक विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. तत्कालीन पो. नि. दिलीप जाधव, तत्कालीन सपोनि राजेंद्र मस्के, पोहेकॉ. मोमीन, माने, सेवानिवृत्त उपनिरीक्षक वाघमोडे यांची वेतनवाढ रोखली आहे. 
चौकशीत आढळले दोषी 
 खून प्रकरणाचा तपास व्यवस्थित न करता आरोपींना सहकार्य केल्याचा ठपका पो. नि. जाधवसह चार कर्मचाºयांवर ठेवला होता. पोलीस प्रशासनाने आपल्याच विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी लावत या सर्वांना त्यांची बाजू मांडण्याची पुर्णपणे संधी दिली होती. कसुरी अहवालात दोषी आढळल्याने प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत सर्वांना त्यांचेवर ठेवलेले आरोप पुराव्यानिशी खोडण्याची संधी दिली होती. मात्र यामध्येही ते दोषी आढळल्याने पोलीस महासंचालक विभागाने विभागीय चौकशीचे आदेश काढले होते. या चौकशीत देखील सर्वांना बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र त्यांच्यावर ठेवलेले आरोप ते खोडू शकले नसल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.  
आर्थिक हितसंबध जोपासल्याचे जाधव यांच्यावर ठपका 
 या खून प्रकरणाचा तपास पोे. नि. दिलीप जाधव यांनी केला होता. मात्र आरोपींशी आर्थिक हितसंबध जोपासत आरोपींना सहकार्य करीत सुखसुविधा पुरवल्याचा ठपका जाधव यांच्यावर ठेवण्यात आला होता. हे आरोप खोडण्याची पुर्ण संधी पोलीस प्रशासनाने जाधव यास दिली होती. मात्र जाधव यांस हे आरोप खोडता आले नाहीत. उलट चौकशीदरम्यान थातूर-मातूर उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. चौकशीत दोषी आढळ्ल्यामुळे सर्वांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जाधव यांचे प्रमोशन थांबले आहे. तर कारवाई होण्याच्या अगोदरच पोहेकॉ वाघामोडे हे उपनिरीक्षक होवून सेवानिवृत्त झाले. यामुळे त्यांच्या पेन्शनमधून कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *