निलेश चाळक बीड : ब्लँकेट विकून जालन्याला पैसे घेऊन जाणाऱ्या मालवाहू जीप चालकाकडून हिरापूरजवळ २ लाख ९ हजार लंपास केल्याची घटना शनिवारी(दि.२५) रात्री घडली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
संभाजी पिसुरे (रा. जालना) असे चालकाचे नाव आहे. ते जालना येथील एका व्यापाऱ्याने दिलेले ब्लँकेट सोलापूर येथील व्यापाऱ्याकडे पाेहचून त्याचे २ लाख ९ हजार ३०० रुपये घेऊन मालवाहू जीप (क्र. एमएच २१, एक्स ६४५७) ने जालन्याकडे जात होते. हिरापूरजवळ इटकूर फाट्याजवळ वाहन पंक्चर झाल्याने शनिवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान ते थांबले होते. त्यावेळी त्यांना दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मारहाण करुन त्यांच्याकडील २ लाख ९ हजार ३०० रुपये घेऊन पोबारा केला. या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. प्रकरणाचा तपास फौजदार शरद पवार हे करत आहेत. घटनास्थळी अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गेवराई ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देत पाहणी केली.

14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर