पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
सोलापूर दि. 28 :- बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दिनांक 7 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता दयानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यात स्मृती ऑरगॅनिक्स, आय पिंग बिपीओ, लक्ष्मी हायड्रोलीक्स, ओ.सी.एस.पी.एल., रेजेन्सि एक्सपोर्ट, सोमाणी एव्हरग्रीन, वेब इन्फॉरमेशन, नवभारत फर्टिलायझर, एल.आए.सी, धुत ट्रांन्समिशन एकुण 10 खाजगी क्षेत्रातील नामवंत उद्योजक उपस्थित राहणार असून 433 रिक्तपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.
जिल्ह्यातील इच्छुक असलेल्या सुशिक्षीत बेरोजगार युवक/युवती तसेच अल्पसंख्यांक समाजातील बेरोजगार व इतर उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार हजर रहावे. तरी 10 वी उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, पदवीधर व आयटीआय, तसेच ड्रायव्हर व सिक्युरिटी सुपरवायझर इ. शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी त्यांच्या मुळ प्रमाणपत्रासह, सेवायोजन नोंदणी कार्ड व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखती साठी हजर राहून खाजगी क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर




