👁 6 Views

सोलापूर जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय इमारतीच्या बांधकामाचे तातडीने नियोजन करावे – विजय देशमुख

पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017
मुंबईदि. 28 : सोलापूर येथे 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय व 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून या इमारतीचे नियोजन तातडीने करावे व इमारतीच्या बांधकामाचा आराखडा त्वरीत तयार करावाअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
सोलापूर येथे 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय व 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय स्थापन करणेबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयीन दालनात आढावा बैठक झालीत्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य वास्तू शास्त्रज्ञ संजय गेडामजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदुरकरसार्वजनिक बांधकामचे उपअभियंता अ.म.कंटीकरशाखा अभियंता आर.एन.सावंतआरोग्य सेवा उपसंचालक डॉ.स.आ.देशमुखसहसंचालक बी.डी.पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
रुग्णांना चांगली सुविधा उपलब्ध होण्यासाठी या इमारतीचे बांधकाम नियोजनबध्द पध्दतीने करण्यात यावे तसेच खासगी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम ज्या पध्दतीने केले जाते त्याच पध्दतीचे उच्च दर्जाचे व सर्व सोयींनी युक्त असे बांधकामाचे नियोजन करावेअशा सूचना राज्यमंत्री श्री.देशमुख यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागातील व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *