👁 8 Views

पंढरीतील रोडरोमियोंच्या त्रासापासून महिला-भगिनींना मुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे पंढरपूर शहर पोलिसांना निवेदन



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- सद्यस्थितीत पंढरपूर शहरामध्ये महिला भगिनी व विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रकार घडताना आढळून येत आहेत. विविध शैक्षणीक संस्था, कोचिंग क्लासेस, बसस्थानक व जिथे महिला भगिनींचा वावर असतो अशा ठिकाणी पंढरपूर शहरातील कांही रिकामटेकडे तरुण घोळक्याने थांबलेले आढळतात. त्यांच्याकडून महिला भगिणींच्या छेडखानीचे व विनयभंगाचे प्रकार घडत आहेत. 
नुकतीच पंढरीतील एका शैक्षणिक संस्थेसमोर अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना पाहता पंढरपूर शहरात रोडरोमिओंनी उच्छाद मांडलेला पहावयास मिळत आहे. याचा त्वरीत बंदोबस्त करुन पंढरीतील महिला भगिनी व विद्यार्थिनींना रोडरोमिओंच्या त्रासातून मुक्त करावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युुवती काँग्रेस पंढरपूर शहर च्या वतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवती पंढरपूर शहराध्यक्षा कु.चारुशिला कुलकर्णी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच दामिनी पथक व निर्भया पथकानेही अधिक सतर्क राहून महिला-भगिणी व विद्यार्थिनींना सुरक्षा पुरवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाषकाका भोसले, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अमरजित गोडसे पाटील, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, महिला तालुकाध्यक्षा अनिता पवार, महिला शहराध्यक्षा रंजना हजारे, सुदामती माळी, मनिषा शिंदे, जयश्री माडगुळकर, भास्करतात्या जगताप, सुभाष बागल आदी उपस्थित होते. यावेळी श्री.दबडे यांनी लवकरच रोडरोमिओंचा बंदोबस्त केला जाईल असे आश्‍वासन दिले.    


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *