👁 9 Views

परळीत इटके कॉर्नरवर एक तास रास्ता रोको, धारूरमध्ये महामोर्चा, अंबाजोगाईतही राष्ट्रवादीने तहसीलवर केला हल्लाबोल



पंढरपूर Live 28 NOVEMBER 2017

निलेश चाळक बीड प्रतिनीधी:- राज्यातील फडणवीस सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे राज्यभरातला कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह अबालवृद्ध मेटाकुटीस आले आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले असून आज परळीमध्ये ईटके कॉर्नरवर जबरदस्त रस्ता रोको करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी परळी तहसीलवर हल्लाबोल केला तर इकडे धारूरमध्ये न भुतो न भविष्यती असा जबरदस्त मोर्चा सरकारविरोधात निघाला. धारूरमध्ये तालुकाभरातील सर्वच क्षेत्रातले लोक मोर्चात सहभागी झाले. त्यांनी थेट तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत आपल्या मागण्या मांडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला जिल्ह्यातून मिळत असलेला प्रतिसाद पाहता सरकारविरोधात प्रचंड रोष असल्याचे दिसून आले. अंबाजोगाईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यभर भाजप-शिवसेना सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडले आहे. कालपासून बीड जिल्ह्यातही तालुकास्तरावर आंदोलने होत आहेत. आज परळी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात झाली. शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करा, बीड जिल्ह्यातली लोडशेडींग तात्काळ रद्द करा, खरीप हंगामातला पीक विमा द्या, शेतकर्‍यांच्या शेतातील नादुरुस्त डीपी दुरुस्त करा, मालाला हमी भाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा, गुजरातच्या धर्तीवर कापसाला भाव द्या, मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर जाहीर हमी भाव व शेतकर्‍याला मिळालेला बाजार भाव यातील फरक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करा, विषारी औषधाच्या फवारणीमुळे बळी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखाची मदत घोषित करा, त्यांच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण द्या यासह आदी मागण्यांसाठी परळीच्या ईटके कॉर्नरवर आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यास राष्ट्रवादीने सुरुवात केली. तब्बल एक तासाच्या रास्ता रोकोमुळे परळी-बीड, परळी- गंगाखेड, परळी-धर्मापुरी हे रस्ते पूर्णत: बंद झाल्यामुळे वाहतूक खोळंबली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या. एक ते दीड तासाच्या रास्ता रोकोनंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते तहसील कार्यालयावर घोषणा देत निघाले. त्याठिकाणी आपल्या मागण्यांचे निवेदन देत हल्लाबोल आंदोलन केले. इकडे धारूरमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलनासाठी तालुकाभरातून हजारो कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर राष्ट्रवादीच्या झेंडक्याखाली एकवटले. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान हल्लाबोल आंदोलनाच्या अनुषंगाने महामोर्चा तहसीलवर निघाला. मोर्चेकर्‍यांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने सरकारविरोधात प्रचंड रोष असल्याचे यावरून स्पष्ट झाले.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *