👁 6 Views

विद्यार्थ्याच्या खिशात बँटरीचा स्फोट: जखमी विद्यार्थ्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू

पंढरपूर Live 29 NOVEMBER 2017

निलेश चाळक बीड :   शाळेचा वर्ग सुरु असताना एका विद्यार्थ्याच्या खिशात मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता मोमीनपुरा येथील जयहिंद प्राथमिक विद्यालयात झाली. हा स्फोट एवढा मोठा होता की संपूर्ण वर्ग हादरला. शिवाय विद्यार्थी भाजला.

मोमीन कामरान खुद्दूस (१०, रा. मोहंमदिया कॉलनी, बीड) असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्षात उपचार सुरु आहेत. मोमीन कामरान हा पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो. घररापासून शाळा जवळच असल्याने तो पायी ये- जा करतो. नित्याप्रमाणे मंगळवारी सकाळी ८ वाजता तो शाळेत जाण्यासाठी पायी निघाला. रस्त्यात त्याला मोबाइलची बॅटरी पडलेली दिसली. उत्सकुतेपोटी त्याने बॅटरी उचलली अन् पँटच्या खिशात ठेवली. दरम्यान, नऊ वाजता वर्ग सुरु झाल्यानंतर बॅटरी गरम झाली. त्याच्या मांडीला गरम जाणवू लागले; पण त्याने कोणालाच काही सांगितले नाही. त्यानंतर काही वेळेतच खिशातच बॅटरीचा स्फोट झाला. यावेळी त्याच्या पँटने पेट घेतला. तो बाकावरुन खाली कोसळला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की वर्गातील सर्व विद्यार्थी भयभीत झाले. त्यानंतर शिक्षक त्याच्या जवळ धावून गेले. त्यांनी त्याच्या पँटची आग विझवून त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली. तो २५ टक्के भाजला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *