निलेश चाळक बीड – जिल्ह्यातील माजलगाव येथील आलापुर बेलुरा व देवळा ही आनेक वर्षे पासून ग्रुप ग्रामपंचायत आहे. तरी सध्याच्या परिस्थितीत आलापुर येथील मतदार लोकसंख्या अकरा शे च्यावरी व देवळा येथील मतदार लोकसंख्या आठशे च्या वरी गेली आहे .महत्त्वाचे असे की ग्रामपंचायत बेलुरा अंतर्गत अलापुर हे गाव असुन सदरील गावास महसूल दर्जा प्राप्त असुन संबंधित गावाची लोकसख्या २००१च्या जनगणनेनुसार ७६७ईतकी असुन ग्रामपंचायत विभक्ती करण करण्यासाठी आवश्यक लोकसंख्या आहे परंतु ग्रामपंचायत सार्वत्रीक निवडणूक दिनांक०२/०५/२०१३ रोजी झालेली आसुन कमीतकमी दोन वर्षे कालावधी ग्रामपंचायत चा झाल्याशिवाय विभक्ती करण करता येत नाही आसे (शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्र.व्ही पी.एम.१२६७/३३५७ई दिनांक १८/१२/१९६७) शासन परिपत्रक क्रमांक ग्रामविकास विभाग क्रमांक व्ही.पी.एम.११७०/१२४२१/ई/दिनां क१६/४/१९७० करिता विभक्ती करणाचा निकषात बसत नाही असे दिनांक २३/०८/२०१३ पंचायत समिती माजलगांव यांनी परिपत्रक मध्ये सांगितले होते तरी आज त्यानी सांगितलेल्या दोन वर्षे कालावधी होऊन नही दोन वर्षे लोटली आहेत तरी ही जिल्हा परिषद बीड. व पंचायत समिती माजलगांव यांनी आलापुर ग्रामस्थच्या ग्रामपंचायत विभक्तीकरणाची दखल घेण्यात आली नाही.
मागील पाच वर्षेपासुन ग्रामपंचायत बेलुरा विभक्त करून मौजे अलापुर ही ग्रामपंचायत ही वेगळी करणेसाठी ग्रामस्थांचे वतीने सतत शासनाकडे पाठपुरावा करणे चालू आहे. परंतु शासन स्तरावर नुसते अश्वासन शिवाय काही ही झालेले नाही. अलापुर हे गाव स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत विकासापासून वंचित राहिले आहे. मुलभूत सुविधा सुध्दा अद्यापही अलापुर गावात मिळालेल्या नसुन सदर गाव वंचित राहिले आहे. याचे कारण ग्रुप ग्रामपंचायत आहे .शासनाने अगदी वाड्यातांडे यांना सुध्दा वेगळी ग्रामपंचायत प्रदान केले आहे.
तरी येत्या ग्रामपंचायत निवडणूक २०१७/१८ तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेमध्ये बेलुरा ग्रामपंचायत ची निवडणूक आरक्षित झाली आहे त्यामुळे वरील नमूद विषयानुसार अलापुर येथील ग्रामस्थानी सदर निवडणूकीवर अलापुर ग्रामपंचायत वेगळी होईपर्यंत निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे तरी आमची मागणी पूर्ण होईपर्यंत निवडणुकीवर टाकण्यात येईल आसा आलापुर येथील अनिरुद्ध दिननाथ फपाळ अशोक सखाराम फपाळ हानुमान कालीदास फपाळ. रामेश्वर बाबासाहेब फपाळ. हरिदास केशव फपाळ बापुराव लिबाजी कुरे.दादासाहेब देवीदास फपाळ. साळीकराम सखाराम फपाळ गजानन पंडित फपाळ भागवत अंबादास धुमाळ. प्रदीप वंचाराम फपाळ. गोपीनाथ शिरंग फपाळ प्रशांत नवनाथ फपाळ दादाराव आन्नाभाउ घेवारे. पाडुरंग सदीपान मानकर ऊध्दव अदिनाथ फपाळ आदी तीनशे ग्रामस्थ यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





