👁 11 Views

वाखरीत आमदार निधीतील सभामंडपाचे भुमीपूजन



पंढरपूर Live 3 December 2017

पंढरपूर : प्रतिनिधी वाखरी ( ता.पंढरपूर) येथील यल्लमा देवीच्या मंदीरासमोर आमदार निधीतून बांधण्यात येणार्‍या नियोजीत सभामंडपाचे भुमीपूजन शनिवार ( दि. 2 डिसे.) रोजी आ.भारत भालके यांच्याहस्ते संपन्न झाले. 
वाखरी येथील श्री. यल्लमा देवस्थान पंढरपूर तालुक्यात प्रसिद्ध असून देवीच्या मंदिरासमोर सभामंडप नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. आमदार भारत भालके यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या आमदार निधीतून सभामंडपासाठी 5 लाख रूपयांचा निधी मंजूर केला असून कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  यल्लमा देवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून शनिवारी या सभामंडपाचे भुमीपुजन आ. भालके यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी देवीचे पुजारी नारायण मनोहर पोरे यांच्याहस्ते आ.भालके यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सौ. मथुराबाई मदने, सहकार शिरोमणीचे संचालक इब्राहिम मुजावर, माजी संचालक शिवाजी मदने, हणूमंत जालिंदर पोरे, माजी सरपंच सुरेश पोरे, माजी संचालक गंगाधर गायकवाड, लक्ष्मण गायकवाड,जोतीराम पोरे, कृष्णदेव चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संग्राम गायकवाड, रामचंद्र पांढरे, पोलीस पाटील बाळासाहेब शेंडे,  तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पोपट गायकवाड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *