👁 9 Views

गुजरात येथे खा.राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परळीत रास्ता रोको…पंतप्रधान नरेेंद्र मोदीं यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन!



पंढरपूर Live 5 December 2017

मोदी सरकारची हुकुमशाही खपवुन घेतली जाणार नाही-प्रा.टी.पी.मुंडे
◆ महादेव गित्ते
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस तथा लोकसभेतील उत्कृष्ट संसदपटू तथा हिंगोलिचे खा.राजीव सातव यांना गुजरात येथे राजकोट पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेर्धात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली परळी येथील शिवाजी चौकात रास्ता रोको व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. खा.राजीव सातव यांना मोदी सरकारची हुकुमशाही काँग्रेस पक्ष खपवुन घेणार नाही. अशा तीव्र शब्दात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांनी निषेध केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजकोट पश्चिम विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार इंद्रनिल राजगुरु यांच्या प्रचारार्थ लावलेले पोस्टर्स भाजपा कार्यकर्त्यांनी फाडले.ते पुन्हा लावण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला असता भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली.या घटनेच्या निषेधार्थ खा.राजीव सातव हे स्थानिक पदाधिकार्‍यांसह लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलिस उपायुक्त वाघेला यांनी खा.सातव यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांना मुख्यालयात बोलावुन सराईत गुन्हेगार असल्यासारखी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.यामध्ये खा.सातव हे जबर जखमी झाले आहेत तर सोबतचे त्यांचे सहकारी राथ यांचाही हात फ्रॅक्चर झाला आहे. सदरील घटना ही लोकशाही मुल्यांचा अनादर करणारी असुन मत व्यक्त करण्याच्या मुलभुत अधिकारांवर, विचार स्वातंञ्यांवरच गदा आणणारी आहे. गुजरात पोलिसांची भूमिका ही भाजपा धार्जिणी व पक्षपाती आहे.संसदेने उत्कृष्ट संसदपटु म्हणुन गौरविलेल्या खासदार सातव यांना झालेल्या मारहाणीचा परळी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रास्ता रोको सुमारे दोन तास करण्यात आला. रस्ता रोेको व पुतळा दहन करुन निषेधार्थ घोषणा बाजी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे,परळी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रा.विजय मुंडे, शहराध्यक्ष बाबु नंबरदार, जि.प.सदस्य प्रदिपभैय्या मुंडे,   ज्येष्ठ नेते सल्लोदीन मामु, माजी नगरसेवक इसाकभाई कटाळु, माजी नगरसेवक सुदाम लोखंडे, माजी नगरसेवक तथा रिपाई एकतावादीचे पंडित झिंझुर्डे, परळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर जाधव, सय्यद (बबलू) साजेद, जम्मू सेठ, शेख बद्दरभाई, शामराव गडेकर, मतीन मनियार, मधुकर ढाकणे, आत्माराम नागरगोजे, रंघुनाथ डोळस, नागेश व्हावळे, नितीन शिंदे, इलियास शेख, अशोक कांबळे, बालासाहेब डबडे, मनोज संकाये, रमेश संकाये,शिवा बडे, महादेव दौंड, बापु ताटे, शेख सिंकदर,कबीर ढाकणे, सतिश मुंडे, नुर कुरेशी, दामोधर घुगे, मुरली गायकवाड, बन्सी पोटभरे, किशोर कांबळे, इरफान शेख, संजय पवार, पांडुरंग सलगर, बाबासाहेब बनसोडे, श्रीमंत कांगणे, सतिश डुमणे, बाबा शेख, शिवा चिखले, युवा नेते राहुल कराड आदि पदाधिकारी उपस्थित होते.  


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *