👁 9 Views

पंढरपूर पोष्ट ऑफीस मधील अधिकार्‍यांच्या भोंगळ कारभारा विरोधात शिवक्रांती विद्यार्थी संघटना आक्रमक…

पंढरपूर Live 4 December 2017

अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे 
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होतोय त्रास..!
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर प्रधान डाकघर (मुख्य पोष्ट ऑफीस) मध्ये आधारकार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करण्याचे कामकाज चालु आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी येथे मोठ्या प्रमाणात यासाठी जमतात. परंतु येथील सदर काम करण्याची वेळ ही फक्त सकाळी 10 ते 11 एवढीच असल्याने विद्यार्थी आपले कॉलेज अथवा कोचिंग क्लासेस बुडवून येथे रांगेत उभे राहतात परंतु त्यांचे हे काम वेळेत होत नाही. यासंदर्भात येथील अधिकार्‍यांना जाब विचारायला गेल्यावर, आम्ही समाजसेवा करतोय, हे आमचे काम नाही, कुठे तरी बाहेर जाऊन करा! अशी उर्मट भाषा वापरली जाते. पोष्ट खात्याच्या अधिकार्‍यांच्या या भोंगळ कारभाराविरोधात शिवक्रांती विद्यार्थी संघटन ने आक्रमक भुमिका घेतली असून पोष्ट खात्याच्या अधिकार्‍यांना यासंदर्भात एक निवेदन देऊन आधार कार्ड लिंक करण्यासाठी कार्यालतीन वेळेत वाढ करण्याची मागणी केली आहे.   
शासनाने केलेल्या नियमानुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या आधार कार्डशी आपला मोबाईल क्रमांक जोडणं बंधनकारक आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वांसाठी ही लिंक जोडण्यासंदर्भातील शासनाकडूनची अधिकृत सुविधा पंढरपूर मुख्य पोष्ट कार्यालयात आहे. परंतु येथील अधिकार्‍यांनी यासाठी फक्त एकच तास वेळेचे बंधन ठेवणे सर्वांसाठीच अन्यायकारक आहे. फक्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांवरसुध्दा ही बाब अन्यायकारक ठरणारी आहे. विद्यार्थ्यांना आधारकार्डला आपला मोबाईल क्रमांक जोडल्याशिवाय शिष्यवृत्तीचा फॉर्म सुध्दा मिळत नाही. परंतु गेल्या तीन आठवडयापासून पंढरपूर पोष्ट कार्यालयात यासाठी विद्यार्थी रांगेत उभे राहतात आणि मोकळ्या हाताने परततात! कारण दररोज तीन किंवा चारजणांचेच काम एक तासाभरात होते. त्यामुळे यासंदर्भातील कामकराज पोष्ट ऑफीसमध्ये जास्त वेळ चालणं गरजेचं आहे. पोष्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वाढवून घेणं आवश्यक आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय न झाल्यास शिवक्रांती विद्यार्थी संघटन कडून पंढरपूर मुख्य पोष्ट कायार्र्लयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष विकी झेंड यांनी एक प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
यावेळी शिवक्रांती विद्यार्थी संघटन चे सोलापूर जिल्हाध्यक्ष विकी झेंड, तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे-नाईक, शहर कार्याध्यक्ष सोपानकाका देशमुख शहर संघटक सचिन क्षिरसागर, अतुल टिंगरे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.   




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *