👁 10 Views

लॉजवरील छाप्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; तिघांविरोधात गुन्हा

पंढरपूर Live 6 December 2017

निलेश चाळक बीड-अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी   वेश्याव्यवसायाचा  पर्दाफाश केला. अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्ष व अंबाजोगाई शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ही संयुक्त कारवाई केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली असून तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार,  प्रशांतनगर भागातील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंध वाहतूक कक्षाच्या प्रमुख व फौजदार दीपाली गीते यांना मिळाली होती.  त्यांनी पोलिस अधीक्षकांना ही माहिती दिली. जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अप्पर  अधीक्षक वैभव कलुबर्मे, अंबाजोगाईचे   अधीक्षक अजित बोऱ्हाडे व सहायक   अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गीते, शहर ठाण्याचे फौजदार भारत माने, फौजदार देवकन्या मैंदाड, पो. कॉ. नीलावती खटाणे, सलीम पाशा, विकास नेवडे यांनी मंगळवारी दुपारी जनता लॉजवर छापा टाकला. लॉजमालक इतर महिला व ग्राहकांना बोलावून घेत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी लॉजमालक नारायण गुडे, व्यवस्थापक सचिन दुधाने आणि ग्राहक शकूर सय्यद (अहमदपूर जि. लातूर) यांना अटक करण्यात आली. दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांची सुटका केली. तिन्ही आरोपींविरुद्ध पिटा काद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *