👁 8 Views

वंचीत निराधारांना कुडकुडणार्‍या थंडीत कोळी महासंघाने दिली मायेची उब..!

पंढरपूर Live 6 December 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु चंद्रभागेच्या पात्रात व विविध घाटावर उघड्या अंगाने रात्रभर हुडहुडणारी थंडी सहन करत अनेक निराधार, बेवारस, वंचीत समाजबांधव आपली जगण्याची लढाई लढताना आढळतात. या बंधू-भगिणींना कोळी महासंघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहन सावतराव यांच्या प्रयत्नातून नुतेच उबदार चादरींचे वाटप करुन त्यांना मायेची उब देण्याचे सत्कर्म करण्यात आले. 
‘‘एकीकडं गगनचुंबी इमारतीमध्ये विलासी आयुष्य भोगत ऐषोआरामाचे जीणं जगणारी मंडळी तर दुसरीकडं नशिबात आलेल्या दारिद्ˆयाचे चटके आयुष्यभर सहन करणारे निराधार, शोषीत वंचीत समाजबांधव या महाराष्ट्रात कसेबसे आपलं जीणं जगताना आढळून येतात.!’’ पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे अनेक वयोवृध्दांना पोटची लेकरंच चंद्रभागेच्या काठावर  सोडून  जातात, अनेक मतिमंदांनाही येथे आणून सोडले जाते. अशांना आधार असतो तो फक्त मायबाप पांडुरंगाचा! त्यांना फुल ना फुलाची पाकळी मदत करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा व सामाजिक संघटनांचा! समाजातील गरीब व श्रीमंतांमधील वाढत जाणारी दरी कुठे तरी भरुन यावी व दु:खाचे चटके सहन करत चंद्रभागेच्या काठावर व वाळवंटात वेदनादायी जीवनाचे चटके सहन करत जगणार्‍या निराधार वंचींतांच्या वेदनांवर थोडीशी मायेची फुंकर घालावी या उद्देशाने आज कोळी महासंघाचे वतीने सर्वांना उबदार चादरींचे वाटप करण्यात आले.
चंद्रभागेच्या काठावरील दत्त घाट, महाद्वार घाट येथील व चंद्रभागेच्या वाळवंटातील निराधार वंचीत बंधु-भगिणींना उच्च दर्जाच्या उबदार चादरींचे वाटप करताना कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बबलु बोराळकर, नगरसेवक विक्रम शिरसट, तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव, पै. समाधान अधटराव, राहुल अधटराव, राजु सावतराव, देविदास टोमके, ओंकार कोताळकर, सतीश पाडुळे, आण्णा अटकळे, विशाल सतीश नेहतराव, आण्णा मोरे, अक्षय शिंदे, विजय सावतराव, अजय सावतराव, सुमीतभैया सावतराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *