👁 6 Views

पंढरीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न..राष्ट्रवादीस बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करा -खा.विजयसिंह मोहीते पाटील

पंढरपूर Live 6 December 2017
राष्ट्रवादी कॉग्रेस़ पक्षच सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करू शकतो.कष्टकरी शेतकर्‍यांना न्याय देवू शकतो याची पुन्हा एकदा जाणीव राज्यातील सत्तांतरानंतर जनतेला झाली असून राष्ट्रवादी कॉग्रेसशिवाय पर्याय नाही अशी भावना जनतेमध्ये वाढीस लागली आहे.अशावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्‍यांनी समन्वय राखून एकजुटीने काम करणे गरजेचे झाले आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व खासदार विजयसिंह मोहीते-पाटील यांनी केले आहे.पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.या मेळाव्यास राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे-पाटील,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील,आप्पासाहेब जाधव,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,जिल्हा सचिव लतीफ तांबोळी,जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणिस दिगंबर सुडके,राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे,राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत व राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर,किसान सभा अध्यक्ष मारुती जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


           यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील म्हणाले की,पंढरपूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसची नव्या जोमाने बांधणी होत असून कार्यकर्त्यांचा विशेषत: युवकांचा ओढा या पक्षाकडे वाढला आहे.जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांबरोबरच नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांनाही सोबत घेवून काम केल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस विधानसभा निवडणूकीत या तालुक्यातील चारही मतदार संघातून आपला आमदार विधानसभेत पाठवेल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
                या मेळाव्याच्या निमित्ताने नव्या पदाधिकार्‍यांच्या निवडींचे पत्र खा.विजयसिंह मोहीते-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी रहीमभाई हाजी हजरत शेख,गिरीष कांतीलाल चाकोते,आण्णा औदुंबर कोळी,महादेव श्रीमंत माळी तर सचिवपदी विजय रामचंद्र काळे.खजिनदारपदी विठ्ठल जालींदर आटकळे,सरचिटणीसपदी प्रकाश शिवदास थिटे,सोशल मिडिया प्रमुखपदी भुषणकुमार गायकवाड यांची,शहर संघटकपदी महंमद साहेबलाल मुलाणी यांची निवड करण्यात आली.तर कार्यकारीणी सदस्यपदी मल्हारी गणपत पवार,रामचंद्र संपत पवार यांची निवड करण्यात आली. महिला कार्यकारीणी उपाध्यक्षपदी जयश्री राऊत,सरचिटणीसपदी अनिता नगरे,चिटणीसपदी सरस्वती बनसोडे,प्रवक्ता वनिता घोडके,सचिव लक्ष्मी गायकवाड,कार्यकारीणी सदस्य अर्चना शिंदे,सुनिता दहीहंडे,बायडा अभंगराव,मंगल नाव्हर,सुवर्णा कांबळे,पुष्पा आदमिले यांची निवड करण्यात आली.पढरपूर शहर राष्ट्रवादी कॉग्रेस विद्यार्थी आघाडीच्या शहर कार्याध्यक्षपदी अभिजीत साळुंखे,अल्पसंख्यांक विभाग शहर उपाध्यक्षपदी शाहरुख मुलाणी,ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी मनोज आदलिंगे यांची निवड करण्यात आले.
      या मेळाव्यास राष्ष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले,तालुकाध्यक्ष ऍड.दिपक पवार,पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष दिपक वाडदेकर,राष्ट्रवादी कॉग्रेस युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गुरुराज अभंगराव,किसान सभेचे तालुका अध्यक्ष कृष्णा माळी,अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष गुलाब मुलाणी,डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ.पंकज गायकवाड,वकील सेलचे अध्यक्ष प्रशांत उंडाळे,ओबीसी सेल अध्यक्ष अनिल सप्ताळ,ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष आण्णासाहेब पवार,तालुकाध्यक्ष महादेव पाटील,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संदीप गाजरे,सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप भोसले,सेवादालाचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे,तालुकाध्यक्ष सुभाष बागल,अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष  रशीद शेख,सलीम मुलाणी,जि.प.सदस्य अतूल खरात,महीला राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजना हजारे,तालुकाध्यक्ष अनिता पवार,युवती राष्ट्रवादी कॉगे्रसच्या अध्यक्षा चारुशीला कुलकर्णी,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष सुधामती माळी,तालुकाध्यक्ष जयश्री माडगूळकर,मनिषा शिंदे ,तालुका उपाध्यक्ष वैशाली पाटील,संगीता पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी,कार्यकर्ते व राष्ट्रवादी प्रेमी नागरिक उपस्थित होते.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *