👁 9 Views

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मध्यवर्ती इमारतीत अभिवादन

पंढरपूर Live 6 December 2017

सोलापूर दि.6 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मध्यवर्ती इमारत येथे अभिवादन करण्यात आले.
सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, सहसंचालक सतीश देशपांडे, प्रकल्प संचालक रवींद्र माने, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, कुंदन भोळे आदी अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहकार, कृषी, जिल्हा माहिती कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन, उच्च शिक्षण विभाग, नगररचना कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महामानव ग्रंथास वाचकांचा उत्तम प्रतिसाद


दरम्यान, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतआवारात शासनाने मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. राज्य शासनाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रकाशित झालेल्या विविध लेखांचे संकलन  असणाऱ्या महामानव हा ग्रंथ  लोकराज्य स्टॉलवर विक्रीस ठेवण्यात आला होता. या ग्रंथाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.




14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *