👁 9 Views

बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा



पंढरपूर Live 7 December 2017

निलेश चाळक बीड  : मोठ्या प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ८९ हजार २८४ कर्जदार शेतक-यांचा सातबारा कोरा झाला असून, ४३० कोटी ५० लाख रुपये मंजूर होऊन बुधवारपासून पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे.
८९ हजार २५३ पैकी ४० हजार १८८ लाभार्थी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे असून उर्वरित लाभार्थी राष्टÑीयकृत बॅँकांचे आहेत.
शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निकष ठरविले होते. त्याची छाननी करण्यात बॅँकांचा वेळ गेला. नंतर आयटी सेंटरकडून मागविली जाणारी माहिती, सॉफ्टवेअरमधील बदलामुळे विलंब होत असल्याने सरकारवर टिकेची झोड उठली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ७ हजार ६४ शेतकरी पात्र ठरले होते. यात २००९ ते २००१६ पर्यंतच्या कर्जदार शेतक-यांचा समावेश आहे.
१ डिसेंबर रोजी बीड जिल्हा दौºयावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडवणी येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील दोन लाख शेतक-यांचे ८०० कोटी रुपये माफ होतील असे संकेत दिले होते. त्यामुळे आशा पल्लवीत झाल्या होत्या. आतापर्यंत तीन ग्रीन लिस्ट जारी झाल्या होत्या. आॅक्टोबरमध्ये पहिला टप्पा, २४ नोव्हेंबर रोजी दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा ६ डिसेंबर रोजी याप्रमाणे ग्रीन लिस्ट प्राप्त होऊन तो निधी बॅँकांना मंजूर झाला. संबंधित कर्जदार शेतकºयाच्या खात्यावर तो जमा करुन खाते बेबाक करण्यात आले.
जिल्हा बँकेचे ४० हजार १८८ लाभार्थी
जिल्ह्यातील अकरा बॅँकांतील पात्र ८९ हजार २८३ शेतकरी कर्जदारांना ४३० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. शासन निर्देशानुसार पुढील प्रक्रिया बॅँकेमार्फत होईल, असे जिल्हा अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी सांगितले.






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *