पंढरपूरः- जीव्हीके बायोसायन्सेस संशोधन व विकास केंद्र अंतर्गत असलेल्या हैद्राबाद स्थित एक्स्लेरा नॉलेज सोल्युशन्स प्रा.लिमी.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित बी.फार्मसी महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आल्याची माहिती बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी.कुलकर्णी यांनी दिली.
औषध निर्माण क्षेत्रात नवनवीन संशोधन करणाऱ्या हैद्राबादमधील एक्स्लेरा नॉलेज सोल्युशन्स प्रा. लिमी. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे प्रमुख वरिष्ठ तांत्रिक संशोधन विश्लेषक श्रीनिवास दांडूपत्ती व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या पूल इंटरव्यूवमध्ये गोपाळपूर येथील बी.फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षणपध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून बी. फार्मसीमधून गतवर्षी उत्तीर्ण झालेले सारिका लक्ष्मण चोपडे, नेहा नंदकुमार कुलकर्णी, पूजा विलास कोळी, श्रुष्टी प्रदीप शहा व नितीन राजेंद्र चौंडावार या ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. पाच पैकी चौघे ह्या विद्यार्थिनी आहेत. स्वेरीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण गेल्यावर्षी पेक्षाही अधिक गतीने वाढत असून कंपनीस पात्र असे विद्यार्थी स्वेरीतून घडविले जात आहेत. त्यामुळे अनेक विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’या सूत्रानुसार विद्यार्थ्यांना शिस्त, वर्तणूक, इतरांबरोबर भाषा संभाषण करताना आपली ‘बॉडी लॅग्वेज’ कशी असावी ? तसेच नोकरीसाठी संबधित अभ्यास व ट्रेनिंग विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. एस.आर.माने व आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेळ वाया न जाता त्वरित नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. अभियांत्रिकीबरोबरच फार्मसी देखील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आघाडी घेंत असल्याचे दिसून येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडा तसेच संस्थेतील विश्वस्त,संस्थेअंतर्गत असणाऱ्या इतर तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी अभिनंदन केले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर








