👁 9 Views

बाबू नवगिरेंची न्यायासाठी परवड; राष्ट्रपती भवनासमोर आत्महत्येची मागितली परवानगी



पंढरपूर Live 8 December 2017

निलेश चाळक बीड : न्यायाच्या प्रतीेक्षेत असलेल्या सामान्यांची संवेदनशून्य प्रशासन व व्यवस्थेकडून कशी थट्टा होते हे बाबू नवगिरे यांच्याकडे पाहून कळते. त्यांच्या राहत्या घरावर झालेल्या अतिक्रमण हटविण्यासाठी मागील १४ वर्षांपासून त्यांचा शासनदरबारी लढा सुरु आहे; परंतु त्यांची उपेक्षाच झाली. साठी ओलांडलेल्या नवगिरेंनी आता थेट राष्ट्रपती भवनासमोर आत्महत्येची परवानगी मागितली आहे.

मूळचे नाळवंडी येथील बाबू नवगिरे हे कारागिर. शेतीउपयोगी औजारे बनवून त्याच्या विक्रीतून येणाऱ्या  चार पैशांवर त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. त्यांच्या घरावर गावातीलच काही जणांनी २००३ मध्ये अतिक्रमण केले. यासंदर्भात त्यांनी पिंपळनेर पोलिसांत तक्रार दिली; परंतु जुजबी कारवाई पलीकडे काही झाले नाही. त्यानंतर अतिक्रमण हटवून न्याय द्यावा या मागणीसाठी नवगिरेंचा लोकशाही मार्गाने एकाकी लढा सुरु झाला. ग्रामपंचायत कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत त्यांनी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले; परंतु जागोजागी केवळ कागदी घोडे नाचविण्यात आले. त्यामुळे नवगिरेंनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिवाय भारत – पाकिस्तान सीमेवर जाऊन उपोषण केले. नवगिरेंना न्याय तर दूरच; पण या आंदोलनामुळे दोन महिने कारागृहात जावे लागले. सलग १४ वर्षांपासूनच्या लढ्यानंतरही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेले नवगिरे आता थकले आहेत. न्यायाच्या प्रतीक्षेत मानसिकदृष्ट्याही ते खचले आहेत. त्यामुळे आता त्यांनी अखेरचा उपाय म्हणून थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करावी व आपल्या १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई द्यावी यासाठी त्यांनी राष्ट्रपती भवनासमोर आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे.
२००३ पासून माझा न्यायासाठी लढा सुरु आहे; परंतु माझ्या वाट्याला मनस्तापाशिवाय काहीच लागले नाही. पैशापुढे शहाणपण अन् न्याय मिळत नाही हे मला कळून चुकले आहे. माझ्या मुलांचे शिक्षण अर्ध्यावर सुटले, मला जेलमध्ये जावे लागले. आता शरीर साथ देत नाही. संवेदशनशून्य व्यवस्थेत गोरगरिबांना न्याय मिळत नाही म्हणून  राष्ट्रपती भवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
-बाबू नवगिरे, नाळवंडी






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *