👁 16 Views

पंढरपूर नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदासाठी परिचारक गटाकडून इच्छूक-उमेश सर्वगोड

पंढरपूर Live 14 December 2017

पंढरपूर नगरपरिषद स्वीकृत नगरसेवक पदासाठी परिचारक गटाकडून इच्छूक-उमेश सर्वगोड
पंढरपूर (प्रतिनिधी):- आमचे नेते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक, जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक, पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या शब्दाचा मान राखत मी अनेकदा पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुक रिंगणातून माघार घेतली आहे.  माझ्या भागातील नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व जनसेवेसाठी किमान आत्ता तरी मला स्वीकृत नगरसेवक पद देवून आमचे नेते न्याय देतील. अशी अपेक्षा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व आरपीआय चे युवक नेते, भीमशक्ती सांस्कृतीक कला व क्रीडा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक उमेश सर्वगोड यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.  
माझ्या भागातील नागरिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी मी जेंव्हा जेंव्हा नगरपरिषद, अथवा इतर शासकीय कार्यालयात गेलो तेंव्हा मला प्रकर्षाने  जाणवले की, समाजकार्य करण्यासाठी वंचीत, शोषीत व अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी राजकारणात आपला शिरकाव होणे अत्यंत आवश्यक आहे. किमान पंढरपूर नगरपरिषदेच्या सत्तेत तरी सहभागी होणे आवश्यक होते. म्हणून मी राजकारणात सक्रीय झालो. राजकाणातील संत म्हणून ओळखले जाणारे आदरणीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक व पंढरपूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक  यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारणात सक्रीय झालो. पुढे सलग चार वेळा संपुर्ण तयारी असुनही उमेशराव परिचारक यांच्या शब्दाचा मान राखत मी नगरपरिषदेच्या मागील अनेक पंचवार्षिक निवडणुकांमधून सपशेल माघार घेतली. नेत्यांनी मला शब्द दिला होता की, पुढे संधी मिळताच सर्वप्रथम आपल्या नावाचा विचार केला जाईल. 
आत्ता संधी जवळ आलीय. स्वीकृत नगरसेवकांचा कार्यकाल लवकरंच संपणार आहे. यावेळी निदान स्वीकृत नगरसेवक म्हणून तरी माझी नियुक्ती करुन माझ्या आजपर्यंतच्या एकनिष्ठतेचे फळ नेत्यांकडून मिळेल अशी अपेक्षा असल्याने यासंदर्भात मी नेत्यांकडं तशी मागणीही केली आहे.आशा आहे की, आमचे नेते माझ्या या मागणीचा विचार करुन माझी परिचारक गटाकडून पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करतील व मला जनसेवेची संधी मिळेल. 






14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *