पंढरपूर Live 17 December 2017
नववर्षाच्या स्वागतालाच प्लास्टीक मुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश
निलेश चाळक बीड – स्वच्छ सर्वेक्षण 2018 या वर्षाकरता बीड शहराची निवड झाली आहे. शहरातील नागरीकांना स्वच्छतेबाबत ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, कचरा साठवणुकीसाठी डस्टबीनचा वापर करणे, शौचालयाच्या बांधकामाबाबत जनजागृती करणे यासाठी बीड शहराच्या स्वच्छता *ब्रँण्ड अॅम्बेसेडर म्हणून डॉ.दिपाताई क्षीरसागर* यांची नियुक्ती करण्यात आली असून नववर्षाच्या स्वागतालाच प्लास्टीक मुक्ती आणि स्वच्छतेचा संदेश देण्याचा संकल्प नगरपालिका, महिला संयोजन समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
आज बीड नागरपरिषदमध्ये शहरातील महिला समन्वय समिती बीड आणि नगरपालिकेच्या वतीने एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत प्लास्टीक मुक्ती आणि स्वच्छते बाबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. आगामी काळात स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत बीड शहराची निवड झाली आहे. शहरात प्लास्टिक बंदी मोहीम सुरू असून प्लास्टिक पिशवीच्या ऐवजी कापडी पिशवी दैनंदीन वापरात यावी म्हणून महिला संयोजन समितीच्या माध्यमातून महिला बचतगटाद्वारे कापडी पिशवी तयार करण्यात येणार आहे. येत्या *14 जानेवारी रोजी संक्रांत सनानिमित्त शहरातील महिलांना कापडी पिशव्यांचे वान देण्याचा निर्णय घेण्यात आला.* या माध्यमातून प्लास्टिक मुक्त बीडच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी डॉ.दिपाताई क्षीरसागर यांना ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी झालेल्या बैठकीत प्लास्टीक मुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृतीच्या दृष्टीने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे *1 जानेवारी 2018 रोजी नगरपालिका व महिला संयोजन समितीच्या माध्यमातून स्वच्छता संदेश रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये शाळा, महाविद्यालय, बचतगटातील महिला व नागरिकांचा सहभाग असणार आहे.* बिनकामी साड्यांच्या पिशव्या तयार करून प्लास्टीक ऐवजी या कापडी पिशव्या वापराव्यात तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी प्रत्येक घरात न.प.आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दोन डस्टबीनचे वाटप करण्याचाही संकल्प करण्यात आला आहे. प्लास्टीक मुक्ती आणि स्वच्छता यासाठी शहरातील महिला डॉक्टरांनी पुढाकार घेतला असून नागरिकांमध्ये शौचालयाचा वापर व बांधकामा बाबत जनजागृतीसाठी माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, नगरसेविका जयश्री विधाते, पठाण जलील खान, सादेक अली, महिला समन्वय समितीच्या डॉ.माधवी पालसिंगणकर, स्नेहल देशपांडे, डॉ.विजया राऊतमारे, सोनाली बार्शीकर, राजश्री सावंत, डॉ.रेखा पिंगळे आदी महिला उपस्थित होत्या.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





