👁 8 Views

गोष्ट एका लग्नाची…. वधूच्या वडीलांची ईच्छा मिञाने केली पुर्ण!

पंढरपूर Live 18 December 2017
निलेश चाळक बीड-मित्रप्रेमाच्या अनेक सुरस कथा आपण वाचल्या, ऐकल्या असतील पण मृत्यूपश्चात मैत्रीचं नातं निभावण्याचे औदार्य फार कमी जण दाखवतात. परळीतील उद्धव बोराडे यांचे मित्रही याला अपवाद नाहीत. मुलीच्या लग्नाबद्दलची इच्छा मित्रांजवळ बोलून दाखवली अन तीन महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. घरात केवळ त्यांची आई अन मुलगी. मित्रांनी उद्धव यांच्या आईला धीर तर दिलाच पण वडीलकीच्या भूमिकेतून त्यांच्या मुलींचेही थाटामाटात लग्न लावून दिले. सुदैवाने वरमंडळीही भेटली सामाजिक जण असणारी. त्यांनी हुंडा न घेता मुलीला सून म्हणून स्वीकारले. गुरुवारी (दि.१४) येथील सावंत माळी मंदिरात हा विवाह पार पडला.

उद्धव बोराडे (४०) यांचे तीन महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. उद्धव घरातील एकटाच कर्ता पुरुष. वडील लहानपणीच निधन पावलेले. आई गयाबाईंनी त्याला लग्न-कार्यात पोळ्या लाटून मिळणाऱ्या कमाईतून लहानचा मोठा केला. बबन गित्ते यांच्या दुकानातील मालाची ने-आण करणारा रिक्षा चालवून पोट भरणारा उद्धव वृद्ध आई गयाबाईंसह पत्नी आणि तीन मुलींचा आधार होता. अचानक कसल्यातरी आजारात तो अकाली गेला. मुलीचे लग्न साजेसे करायचे आहे, अशी इच्छा त्याने त्याचे मित्र चंद्रकांत शिंदे, अर्जून कराळे, विलास कराळे, गोविंद पोळ, नंदागौळ येथील उपसरपंच सुंदर गिते, सचिन आरसुडे, लक्ष्मण अनंतपुरे, जालिंदर नाईकवाडे आदींजवळ बोलून दाखवली होती. मात्र, तत्पूर्वीच उद्धव जगातून निघून गेला. आता उद्धवच्या मुलीचे लग्न कसे करायचे, असा प्रश्न गयाबाईंसमोर उभा राहिला. जमीन नाही की, विक्री करून चार पैसे जमवून लग्न करावे, असे काहीही नाही. प्रश्न मोठा घोर लावणारा होता. अखेर मित्रांनीच उद्धवच्या मुलीच्या लग्नाच्या इच्छेची आठवण झाली आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. 

तालुक्यातील नैकोटवाडीच्या मंगश शिंदे याचे स्थळ आले. त्याने हुंडा म्हणून एक छदामही न घेता सारिकाशी लग्नाची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे विवाहाची तयारी सुरू झाली. चंद्रकांत शिंदे यांनी उद्धव काम करीत असलेले त्याचे मालक बबनराव गित्ते यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी खुल्या मनाने मदतीचा हात पुढे केला. सावता माळी मंदिर व्यवस्थापनाने सभागृहाच्या मूळ भाडय़ातील बरीच रक्कम कमी करून ते उपलब्ध करून दिले. आचारी, किराणा दुकानदारापासून लग्नासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू, कार्याचा भार उचलण्यासाठी मदतीचे अनेक हात पुढे आले. अखेर उद्धवच्या मुलीचे लग्न त्याने केलेल्या कल्पनेपेक्षाही चांगल्या पद्धतीने पार पडले.





पाठवणीवेळी गहिवरला मित्रपरिवार 
लग्न समारंभ झाल्यावर सर्व विधी करण्यात आले. त्यांनतर सारिकाला सासरी पाठवण्याची वेळ आली आणि तिने या लग्नासाठी पुढाकार घेतलेले चंद्रकांत शिंदे यांचे व वडिलांच्या इतर मित्रांचे दर्शन घेतले. यावेळी शिंदेंसह उद्धव यांच्या सर्व मित्र गहिवरले. बापासमान प्रेम देणाऱ्या मित्रांच्या वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवताना तिचा कंठ दाटून आला होता. यावेळी उपस्थित वर्हाडींचे डोळे चिंब झाले होते.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *