पंढरपूर Live 18 December 2017
स्वेरीत पोलीस प्रशासनातर्फे तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन
पंढरपूर- ‘पोलीस क्षेत्रात काम करत असताना अधिकाऱ्यांना काही मर्यादा येतात परंतु सुज्ञ नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारी अथवा सामाजिक समस्यांवर मात करता येवू शकते. यासाठी नागरिकांनी आपली थोडीसी मानसिकता बदलली पाहिजे. स्पर्धेच्या युगात समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण बदलणे जास्त गरजेचे आहे. यासाठी आपला विचार, शब्दांची मांडणी योग्य असावी यासाठी स्पर्धेत उतरणे आवश्यक आहे. कारण जीवनात जर स्पर्धा नसेल तर आपले ध्येय साध्य करणे अवघड ठरेल.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात पोलीस विभागातर्फे ‘डायरेक्टर जनरल्स युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप’ कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय शालेय गट व महाविद्यालयीन गट असे स्वतंत्र वकृत्व स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी युपीएससी या स्पर्धा परीक्षेतून थेट आय.पी.एस.अधिकारी झालेले पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगलीच्या वालचंद महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. पी.जी.कुलकर्णी होते. दिपप्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डाँ बी.पी .रोंगे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, ‘प्रत्येक स्पर्धेत हार जीत होतच असते यामुळे व्यक्तिमत्व हे पराभवाने अथवा विजयाने न घडता ते स्पर्धेत सहभाग घेतल्याने घडते. स्पर्धेत जिंकणाऱ्यांचे अभिनंदन करावे तर पराभूत झालेल्यांना सावरायचे हे महत्वाचे असते. अशा स्पर्धेमुळे आयुष्यात उंच भरारी घेण्यासाठी ध्येयवेडे बनावे.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘विकसित भागासाठी विकसनशीलता जास्त वापरावी. आपल्या स्पर्धेमुळे परीक्षकांनाही विचार करावा लागेल अशी स्पर्धेत सहभाग घेऊन विचार मंथनाने विचार सादर करावे.’ सहा. पोलीस अधिक्षक पिंगळे पुढे म्हणाले की, ‘पोलीस प्रशासनाचे कार्य व यावर नागरिकांची भूमिका नेमकी काय असावी यातून विचारमंथन करून पोलीस यंत्रणा आणि नागरिक यामध्ये असलेले बंध आणखी घट्ट होण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या विचार मंथनाद्वारे तोडगा काढता येईल. यासाठी महाराष्ट्र राज्यात या वकृत्व, स्पर्धेद्वारे कल्पना अंमलात आणले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) वीरेश प्रभू व अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वेरीत वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्वेरीच्या कॅम्पसमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.’
या वकृत्व स्पर्धेत जातीयवाद, गुन्हेगारी, वाढती व्यसनाधीनता, किशोरवयीन गुन्हेगारी, छेडछाड, ब्ल्यु व्हेल चॅलेंज, स्त्री अत्याचार या विषयावर स्पर्धकांनी आपले विचार मांडले.या स्पर्धेत द.ह.कवठेकर प्रशाला,यशवंत विद्यालय, कवठेकरन्यू इंग्लिश स्कुल करकंब, आदर्श प्रशाला, करकंब, कला विद्या मंदिर सुस्ते,हनुमान विद्यालय सुपली, सी.बी.पाटील विद्यालय रोपळे व विद्यामंदीर प्रशाला उंबरे पागे या नऊ शाळांनी तर उमा, के.बी.पी व स्वेरी या तीन महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धकांच्या परीक्षेनंतर त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते. त्या प्रश्नांना स्पर्धक देखील तोडीस तोड उत्तरे देत होती. संपुर्ण हॉल चिमुकल्या व तरुणाच्या स्पर्धकांनी भरला होता. यावेळी संपूर्ण दिवसभर चाललेल्या या स्पर्धेतून ‘जातीयवाद, व्यसनाधीनता, छेडछाड, स्त्री अत्याचार हे गुन्हे रोखण्यासाठी युवकांनी पुढे येणे गरजेचे आहे’ असाच सूर उमटत होता. प्रा. विक्रम बिस्किटे व जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे यांनी परीक्षक म्हणून काम उत्तमरित्या पहिले. यावेळी सौरभ चौराडीया, पालक वर्ग, पोलीस अधिकारी, कर्मचारी के.एस.मुजावर, राजाभाऊ घोडके, समाधान पाटील, परशुराम शिंदे, देविदास शिंदे आदी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर पंढरपूरचे वरिष्ट पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी आभार मानले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर






