पंढरपूर Live 18 December 2017
भाजपाच्या व्यापारी आघाडीने दिले निवेदने,अर्ज आणि बैठकीचे पुरावे !
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पंढरपुर तालुक्यात एमआयडीसी व्हावी येथील स्थानिक जनतेचा जिव्हाळयाचा मुद्दा आ.विक्रम काळे,आ.डॉ.सुधीर तांबे,आ.बाळाराम पाटील आदीनी उपस्थित केल्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई लोकप्रतिनिधींची मागणी आहे मात्र स्थानिकांची मागणी नाही असे अजब उत्तर दिले आहे.त्यामुळे पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून विशेषत: शहर व तालुक्यातील व्यापारी,व्यसायीक,बेरोजगार युवक तसेच लघुउद्योजक यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.
या बाबत भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीने शिवसेनेचे ना.सुभाष देसाई यांच्या या उत्तराचा समाचार घेत एमआयडिसीच्या मागणीसाठी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे नवरात्र उत्सव काळात पंढरीत आल्यानंतर पंढरपूर तालुक्यात एमआयडिसी व्हावी अशी मागणी केली होती.त्यावेळी पालकमंत्री ना.देशमुख यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत मुंबई मंत्रालय येथे ना.प्रविण पोटे यांच्या उपस्थितीत पंढरपूर एमआयडिसीच्या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकही घेतली होती.या बैैठकीस ना.विजयकुमार देशमुख,ना.प्रविण पोटे,आ.बबनदादा शिंदे,बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांच्याबरोबर भाजपा व्यापारी आघाडीचे पंढरपूर शहराध्यक्ष नितिन करंडेे,शहर उपाध्यक्ष संजय पालकर,शहर चिटणीस आनंद कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ जगदाळे,भाजप युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय देशपांडे,जिल्हा चिटणीस दत्तसिंह राजपूत आदी या बैठकीस उपस्थित होते.या बैठकीस एमआयडिसीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.या बैठकीवेळी आ.भारत भालके यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडिसी झाली पाहीजे अशा आशयाचे पत्रही दिले होते.
या बैठकीच्या वेळी एमआयडिसीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लवरकच आम्ही पंढरपूर तालुक्यात येवून जागेची पाहणी करु असे आश्वासन दिले होते.भारतीय जनता पक्षाच्या माध्यामतून या एमआयडिसीच्या मागणीसाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख,महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही पत्रव्यवहार करुन व संपर्क करुन मागणी केली होती.असे असताना विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्थानिकांची एमआयडिसीची मागणीच नाही असे उत्तर देवून सभागृहाची दिशाभूल केली आहे.तर पंढरपूर तालुक्यातील जनतेचीही फसवणू केली आहे.स्थानिक जनता या मागणीसाठी कीती आग्रही आहे याची जाणीव ना.सुभाष देशमुख व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीेने शहर व तालुक्यात एमआयडीसी झाली पाहीजे यासाठी सह्याची मोहीम राबवीली जाणार आहे अशी माहीती व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष नितिन करंडे यांनी दिली आहे.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







