👁 6 Views

शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी केली वीजबलांची होळी !


पंढरपूर Live 18 December 2017
राष्ट्रवादी कॉग्रेेस पक्षाच्या वतीने नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करुन भाजपा सरकारच्या शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हिताच्या विरोधात राबवीलेल्या धोरणाचा निेषेध प्रकट केला आहे.यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी हे सरकार जर आपल्या वेदना जाणून घेत नसेल तर या सरकारची देणी देवू नका असे आवाहन केले होते.या आवाहनाचे पडसाद राज्यभर उमटत असून पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथेही शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वीजबीले,पाणीपट्टी आदींची होळी करुन सरकारचा निषेध नोंदवला.

      या बाबत अधिक माहीती देताना शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की,राज्यात 2014 पासून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकर्‍यांची व ग्रामिण जनतेची गळचेपी चालवीली आहे.अच्छे दिन येणार म्हणून कांगावा करीत सत्ता मिळाल्यानंतर ग्रामिण जनतेला कसे दिनवाने बनवीता येईल अशाच पध्दतीचे धोरणे भाजपा सरकारच्या वतीने राबवीण्यात येत आहेत.हे सरकारच आम्हाला मान्य नाही त्यामुळे त्यांचे देणेही आम्ही देणार नाही हीच राष्ट्रवादी कॅाग्रेसची भुमिका असून त्यामुळेच आम्ही आज येथे शासकिय देणे असलेल्या वीज बीले आदींची होळी केली आहे.
           यावेळी संतोष कवडे,बाळसाहेब पाटील,स्वरुप भुसे,विठ्ठल पवार,मधू भोसले,हनुमंत चव्हाण,तुळशीराम कवडे,भीमराव पवार,विजय घाडगे,दत्ता माने,हनुमंत हजारे,भागवत सावंत,नवनाथ वाघमारे,विष्णू चव्हाण सुखदेव भोसले यांच्यासह प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व गुरसाळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.       



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *