👁 6 Views

बीड शहरात खळबळ:सारडा नगरी व विद्यानगरीत दरोडा:सात घरे फोडली


पंढरपूर Live 19 December 2017
निलेश चाळक बीड- सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांत उत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारडा नगरीमध्ये पाच तर विद्यानगर (प.) मध्ये दोन अशी एकूण सात घरे फोडून मंगळवारी पहाटे चोरांनी पोलिसांना उघड आव्हान दिले. रात्रीत सात घरफोड्या झाल्याने शहरात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील सारडा नगरीत   मंगळवारी पहाटे अडीच वाजता पूर्वेकडील संरक्षक भिंतीवरुन चोरांनी आत प्रवेश केला. श्रद्धा इमारतीतील व्यापारी के. मुरलीकृष्ण व डॉ. हारकूट यांच्या घरात घुसून चोरांनी सामानाची उचकापाचक केली. निवेदिता इमारतीत बालाप्रसाद चरखा व अन्य एका घरात कुलूप – कोंडा तोडून चोरांनी डल्ला मारला. यासोबतच आरती इमारतीतही एक घर फोडण्यात आले. दरम्यान, चरखा यांच्या घरातून चांदीचे नाणे व रोख रक्कम लंपास झाल्याची माहिती समोर आली असून इतर घररांतूनही दागिने व रोकड गायब झाली आहे. 

दरम्यान, पहाटे घराच्या कड्या उघडत नसल्याने गोंधळ उडाला. आरडाओरड झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराकडील सुरक्षारक्षक धावून गेले. कड्या उघडल्यानंतर पाच ठिकाणी चोरांनी धुमाकूळ घातल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी घटनास्थळी भेट दिली. अधीक्षक जी. श्रीधर स्वत: शहर ठाण्यात ठाण मांंडून बसले आहेत. त्यांनी स्वत: पोलिसांना   सूचना देत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

दरम्यान, तिकडे विद्यानगर (प.) मध्ये ऋतुजा अपार्टमेंटमध्ये देखील दोन घरे फोडून चोरांनी ऐवज लांबविला. या सात ठिकाणी मिळून नेमका किती रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला याचा तपशीील समजू शकला नाही. मात्र, या घटनेने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
सारडा नगरीमध्ये सुरक्षेसाठी प्र्रवेशद्वारावर दोघांची नियुक्ती केलेली आहे. मात्र, ते समोर आपले कर्तव्य बजावत असताना चोरांनी मागील बाजूच्या संरक्षक भिंतीवरुन आत उड्या घेतल्या. संरक्षक भिंतीवर लोखंडी तारेचे कुंपन आहे. मात्र, भिंतीची उंची कमी असल्याने चोर आरामात आत घुसले. इतर प्लॅटला बाहेरुन कड्या लावून चोरांनी ऐवज लंपास केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.   पोलिसांनी फु टेज ताब्यात घेतले असून त्यावरुन तपास सुुरु आहे.

गस्त वाढविण्याची मागणी
सारडा नगरीत तीनशेवर कुटुंंबे वास्तव्यास आहेत. या भागातील रहिवाशांनी आपल्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत; परंतु चोरांनी पाच घरे फोडून सुरक्षेला आव्हान दिले आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनाधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप मंत्री यांनी केली आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *