👁 8 Views

असोसिएशन ऑफ व्हॅल्युअर्सची कार्यशाळा संपन्न


पंढरपूर Live 19 December 2017
असोसिएशन ऑफ व्हॅल्युअर्स या मान्यताप्राप्त संस्थेने सोलापूर येथे हॉटेल लोटम्मध्ये जिल्ह्यातील व्हॅल्युअर्स आणि इंजिनिअर्स लोकांसाठी त्याचबरोबर इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केलेले होते. या कार्यशाळेसाठी व्हॅल्युएशन प्रांतामधील नगर येथील ख्यातनाम व्हॅल्युअर अविनाश कुलकर्णी आणि मिरज येथील ख्यातनाम व्हॅल्युअर मधुकर गोसावी यांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन असा कार्यक्रम ठेवलेला होता.
अनार्थिक उद्देशासाठी मुल्यांकन तसेच उत्पन्न दृष्टीकोन ठेवून मुल्यांकन या दोन विषयावर सुमारे चार तास अतिशय सोपे सरळ आणि सर्वांना समजेल असे व्याख्यान अविनाश कुलकर्णी यांनी दिले तर बाजारभाव आणि मिळकतींच्या विविध घटकांची पतवारी ह्या विषयावर मधुकर गोसावी यांनी अतिशय साधे व सुंदर असे व्याख्यान दिले. त्याचबरोबर व्हॅल्युएशन हे क्षेत्र किती जबाबदारीचे आहे. याचीही जाणीव करून दिली.
संस्थेचे अध्यक्ष अतुल दोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर सचिव मोहन डी. पाटील यांनी संस्थेची आजपर्यंतची वाटचाल, संस्थेची कार्ये, उद्दीष्ट्ये यावर मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून आलेले मान्यवर सुनिल फोडग, कल्पेश मालू, मोहोळकर, बाळ कुंभार, कोनापुरे, अरूण शहा, बोंद्रे तसेच शिवाजी कॉलेज सांगोला, इंजिनिअरींग कॉलेज तुळजापूर, सोलापूर येथील विद्यार्थ्यांचे या सर्वांचे आभार संस्थेचे सचिव मोहन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद अंकलगी यांनी केले.
फोटो ओळ : दिपप्रज्वलन करताना अविनाश कुलकर्णी सोबत संस्थेचे सचिव मोहन पाटील, अध्यक्ष अतुल दोशी, उपाध्यक्ष सुनिल गोकक.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *