👁 8 Views

परिमल सांस्कृतिक व्यासपीठचे पुरस्कार जाहीर


पंढरपूर Live 20 December 2017
पंढरपूर (प्रतिनिधी) :-  येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या वतीने या वर्षीपासून साहित्य क्षेत्रात भरीव व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्रातील मराठी साहित्यिकांस व साहित्य कृतीस पुरस्कार देण्यात येणार आहे. 


या वर्षीपासून परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या प्रथमच देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी मंगळवेढा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शशिकांत जाधव यांच्या ’दु:खितांचे अश्रू’ या कादंबरीस ’शब्द परिमल पुरस्कार’, गोमेवाडी तालुका आटपाडी येथील गझलकार सुधीर इनामदार यांच्या ’इजांची मखमल’ या गझल संग्रहास ’काव्य परिमल पुरस्कार’, पंढरपूर येथील कथाकार सुजितकुमार कांबळे यांच्या ’टोळकं’ या कथासंग्रहास ’कथा परिमल पुरस्कार’ पंढरपूर येथील युवा साहित्यिक उमेश सासवडकर यांच्या ’वाटेत भेटलेली माणसं’ या ललित लेख संग्रहास ’ललित परिमल पुरस्कार’, मोहोळ येथील साहित्यिक दत्तात्रय चव्हाण यांना अविरत साहित्य सेवेबद्दल ’साहित्य सेवा परिमल पुरस्कार’ आणि पंढरपूर येथील कवी अमर कांबळे यांच्या ’आईच्या रक्ताची जाणीव’ या काव्यसंग्रहास ’साहित्य उदय पुरस्कार’ अशी निवड करण्यात आली आहे. 


     रविवार दिनांक 24 डिसेंबर, 2017 रोजी हॉटेल विठ्ठल इन येथे उमा महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद परिचारक, सोलापूर येथील सुप्रसिद्ध कवयित्री वंदनाताई कुलकर्णी, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शिवाजीराव बागल आणि विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार या मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते पुरस्कार वितरण होणार असल्याचे परिमल सांस्कृतिक व्यासपीठचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले. या पुरस्कार समारंभात कवी राजेंद्र झुंबर भोसले, दादासाहेब खरात, रावसाहेब साठे, आर डी हागवणे, संग्राम जाधव, किरण घोडके, कवयित्री सौ संगीताताई मासाळ, सौ योगीणीताई ताठे या निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. पंढरपूर आणि परिसरातील साहित्यिक, साहित्य रसिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिमल सांस्कृतिक व्यासपीठच्या वतीने करण्यात आले आहे.



14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *