पंढरपूर Live 21 December 2017
कॉग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने रस्ते सफाई करुन राष्ट्रसंत गाडगेबाबांंना आदरांजली
अंधश्रध्देवर प्रहार करीत कष्टकरी जनतेचे स्वच्छतेचा प्रसार व प्रचार करण्यात आपले संपुर्ण जीवन व्यतीत केलेले राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज पंढरीत कॉग्रेस(आय) प्रणित ओबीसी विभागाच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची साफसफाई करुन व अंधश्रध्देस हद्दपार करण्याची शपथ घेवून आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना कॉग्रेस आय महीला विभागाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ.साधना उगले यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,जातीपातीच्या पुढे जावून कार्यकरणारे महान संत होते.अंधश्रध्देमुळे सर्वसामान्य अशिक्षीत जनतेचे शोषण होते हे लक्षात घेवून त्यांनी देवभोळेपणावर वार करीत जनजागृती करण्याचे काम केले.एका हातात खराटा व मुखाने, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला चा गजर करीत बाबांनी त्याकाळी जे प्रबोधन केले त्याची आजही समाजास गरज आहे.हा कार्यक्रम आयोजीत करुन कॉग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी व त्यांच्या सहकार्यांनी खर्या अर्थाने आज बाबांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन यावेळी डॉ.उगले यांनी केले.
यावेळी बोलताना ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी म्हणाले की,‘कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देश द्वेषाने नाही तर प्रेमाने जिंका असा मोलाचा संल्ला देत कॉग्रेस चळवळ बळकट करण्यासाठी समाजसेवेचा वसा हाती घ्या असे आदेश दिले आहेत.राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे कार्य आणि विचार हा आपल्याला लाभलेला समृध्द वारसा आहे.आणि हा वारसा पुढे चालविण्यासाठी स्वच्छतेसाठी हाती खराटा घेवून उतरणे गरजेचे आहे हे ओळखून आम्ही आज हा उपक्रम राबवीला आहे‘
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अशोक डोळ यांनी केले.या कार्यक्रमास कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मामा फलटणकर,जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर,अमर सुर्यवंशी,तालुका महिला कॉग्रेस कमेटीच्या अध्यक्षा राजश्री लोळगे,मा.शहराध्यक्षा आशा बागल,कॉग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले,युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे,सेवादलाचे गणेश माने,राजू उराडे,अभिषेक शहा,दिपक येळे,समाधान रोकडे,शिवाजी धोत्रे,अजीत गंगेकर,सोमेश अभंगराव हे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब आसबे व अमर अभंगराव यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार प्रदर्शन प्रा.मारुती भोसले यांनी केले.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





