पंढरपूर Live 22 December 2017
पंढरपूरच्या रेल्वे स्थानकावर दोन अल्पवयीन मुली संदिग्ध अवस्थेत एका प्लॅटफॉर्मवर बसलेल्या पंढरपूर रेल्वे पोलिसांना आढळून आल्या. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता घरगुती कारणावरुन या दोघीही पळून आल्याचे समजले. त्यांची पंढरपूर रेल्वे पोलिसांनी अधिक चौकशी केली व त्यांच्या पालकांशी संपर्क साधून या दोन्ही मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
आंबेडकर नगर येथून घरगुती कारणांवरुन अल्पवयीन दोन मुलींचे अपहरण झाले. असा (अ.प.क्र. ५०५/१७ क. ३६३ भा.द.वि.) अकोले (जिल्हा अकोले) सिव्हील पोलीस ठाण्यामध्ये १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अकोले येथील त्या अल्पवयीन दोन मुली पंढरपूर रेल्वे स्टेशनवरील १ क्रमांकाच्या फलाटवर २० डिसेंबर रोजी थांबल्या होत्या.
पोहेकॉ. संजय चिटणीस व पोकॉ. विशाल मदने नेहमी प्रमाणे रेल्वे स्टेशनची पेट्रोलींग करत होते. त्यांनी त्या दोन्ही मुलींवर संशय आल्याने, मुलींची चौकशी केली. यावेळी त्या मुली घरगुती कारणावरुन पळून आल्या असल्याची माहीती रेल्वे पोलीसांना समजले. त्या मुलीचे आरोग्याची तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांच्याबरोबर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या दोन महिला कर्मचारी देखील होत्या.
पोहेकॉ. संजय चिटणीस यांनी अकोला पोलीस ठाण्याशी संपर्क साधला, त्यावेळी संबंधीत मुलीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच मुलींच्या आई-वडीलांशी संपर्क केला.
त्यानुसार अकोला पोलीस ठाण्याच्या महीला पोलीस अधिकारी सर्वुणा गोसावी व पो.क. भारती या मुलींच्या आई वडीलांसह पंढरपूर येथे आल्या. यानंतर कायदेशीर कारवाई करुन मुलींना आई-वडीलांचा ताब्यात देण्यात आले, असल्याची माहिती रेल्वे पोहेकॉ. संजय चिटणीस यांनी दिली.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर





