पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 29 December 2017
स्वेरी अभियांत्रिकीचे आठवडाभर चालणार एन.एस.एस. द्वारे श्रमसंस्कार शिबीर
पंढरपूर– ‘गाव पातळीवर श्रम करताना गावातील नागरिकांना सहकार्य करण्याचे हुरूप येतो. असे असताना स्वेरीतील विद्यार्थ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील इतर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वाटचाल करत असतात. स्वेरीतील संस्कारामुळे, विद्यार्थ्यांच्या जडण घडणीला विशेष महत्व प्राप्त होत आहे. यासाठी प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने स्वेरीतच शिक्षण घ्यावे असे वाटते. महाविद्यालयातून मुलांवर मिळणारे संस्कार भविष्यात फार महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वेरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यावा.’ असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक व तंटा मुक्तीचे माजी अध्यक्ष भागवत गाडेकर गुरुजी यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओझेवाडी (ता. पंढरपूर) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिराचे उदघाटन भागवत गाडेकर गुरुजी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गाडेकर गुरुजी मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओझेवाडीचे सरपंच रमेश क्षीरसागर होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.एन. कुलकर्णी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रभात फेरी व ग्राम स्वच्छतेवर भर दिला यासाठी गावातील नागरिकांनी देखील सहकार्य केले. आठवडाभर हा उपक्रम चालणार असून यामध्ये प्रभातफेरी, स्वच्छता, श्रमदान, व्याख्याने, वृक्षलागवड, माती परीक्षण, पाण्याविषयी जनजागृती, गाव सर्व्हे, जलसंवर्धन, निबंध व चित्रकला स्पर्धा हे कार्यक्रम तसेच योगासने, सूर्यनमस्कार श्रमदान, चर्चासत्र, जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. आर.एन.हरिदास व प्रा.एस.एम. शिंदे यांनी सांगितले. आठवड्यानंतर होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ओझेवाडीचे सरपंच रमेश क्षीरसागर लाभणार असून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे अध्यक्षस्थानी असतील. यासाठी रा.से.यो.चे प्रा. एस.आर. गवळी, प्रा. यशपाल खेडकर, प्रा.एस.एम.काळे, एस.एस.गायकवाड, प्रा.ए.एम.कस्तुरे, प्रा. एस.व्ही. बाबर, प्रा. एस.एन.धोत्रे, प्रा. एन.एम.मस्के यांच्यासह विद्यार्थी सचिव अशोक पाटील, बुद्धप्रिय कांबळे, राम काळे, क्रांती देशपांडे, उमेश भक्ते, अक्षयकुमार कोरे, सरिता जाधव, पूजा रोंगे, शुभम बंडगर, गणेश रणनवरे, सुदर्शन शिंदे, तोहीद शेख, प्रतिक सुरवस, आशुतोष देशमुख, प्रदीप क्षीरसागर , महेश क्षीरसागर, विकास नामदे, अक्षय बोडके हे देखील परिश्रम घेत आहेत तर ओझेवाडीतील उपसरपंच दयानंद गायकवाड, ग्रामसेवक ए.ए. मुढे, भास्कर गायकवाड, पंचायत समितीच्या सदस्या, माजी सरपंच व माजी उपसभापती सौ राजश्री पंडित भोसले, रमेश आदमाने यांच्यासह ग्रामस्थ सहकार्यकरत आहेत.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे




