पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
सोलापूर दि.30 :- समाजातील दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे, शहरात त्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी शासकीय वसतीगृहे बांधण्यात येत आहेत. सोलापूर शहरात सामाजिक न्याय विभागामार्फत दोन नवीन शासकीय वसतीगृहे बांधण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी काल बार्शी येथे बोलताना केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बार्शी येथे बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी.एस. कवठे, बार्शीचे नगराध्यक्ष ङ असिफ अब्दुल गनी तांबोळी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, राज्याच्या ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. शहरात त्यांच्या निवासाची, भोजनाची सोय झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक तालुक्यात, मोठ्या शहरात व जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृहे आवश्यक असतात. यासाठी सोलापूर शहरात मुलांसाठी एक आणि मुलींसाठी एक नवीन शासकीय वसतीगृह बांधण्यात येईल. तसेच सांगोला तालुक्यात देखील एक शासकीय वसतीगृह बांधण्यात येइल. यासाठीचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागातर्फे त्वरित पाठवावा असेही श्री. बडोले म्हणाले.
श्री. बडोले म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजनेतून दहावी, बारावीनंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर व शहरी भागात अनुदान देण्यात येते.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेवून विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्याच्या हाताला काम मिळावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर एक कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा मानस असल्याचेही सामाजिक न्याय मंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.बार्शी येथील या वसतीगृहास आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला.
पालकमंत्री विजय देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्हा शैक्षणिक हब होत आहे. येथे शिक्षणासाठी येणा-या गरीब विद्यार्थ्यांच्या राहाण्याची सोय व्हावी यासाठी वसतीगृहांची आवश्यकता आहे. सोलापूर शहरात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक शासकीय वसतीगृह व्हावे अशी अपेक्षा पालकमंत्री देशमुख यांनी केली.
राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, राज्यात निवासी आश्रमशाळा वाढल्या पाहिजेत यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर शहरानजीक जागा उपलब्ध झाल्यास याठिकाणी सामाजिक न्याय विभागामार्फत निवासी शाळा सुरु केली जाईल. प्रत्येक तालुक्यात एक शासकीय वसतीगृह उभारण्याचा मानस असल्याचेही श्री. कांबळे म्हणाले.
पी.एस. कवठे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्ह्यात 15 शासकीय वसतीगृहे व 3 निवासी आश्रमशाळा असून यामध्ये 1310 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त अमित घवले यांनी आभार मानले.
कार्यक्रमास बार्शीचे उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, उपसभापती अविनाश मांजरे, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे यांच्यासह दलित मित्र आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मान्यवर, विद्यार्थी – विद्यार्थीनी व नागरिक उपस्थित होते.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



