पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर Live 30 December 2017
वेळेत नेत्रचिकित्सा करणे म्हणजे सुखी संपन्न आरोग्याची पायाभरणी असून, भविष्यातील धोके टाळणे असल्याचे प्रतिपादन युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, व कामगार कल्याण केंद्र मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने युटोपियन शुगर्स येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते.
सदर प्रसंगी दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ.निनाद नागणे,मोनाली ऑप्टिकलचे प्रमुख अशोक मगदुम,कामगार कल्याण केंद्र,मंगळवेढा प्रमुख सचिन आवळेकर, कामगार कल्याण केंद्र, मंगळवेढा चे ग्रंथपाल टी.बी.माने यांचे सह युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख,अधिकारी वर्ग, व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुढे बोलताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की,मोबाइल,टी.वी.,संगणक आदी.व्यसनांच्या आहारी गेल्याने व विविध प्रकारच्या मानसिक ताण-तणावामुळे सध्या अपुरी झोप होत आहे.त्यामुळे डोळ्यांचे विविध विकार वाढत आहेत. यासाठी वेळेत तपासणी करून उपचार करणे गरजेचे आहे. वेळेत उपचार झाल्यास भविष्यातील अडचणी कमी होणार असल्याचे मत ही पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सचिन आवळेकर म्हणाले की,कामगारांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ यांचे मार्फत आम्ही विविध योजना राबवित असून,याचाच एक भाग म्हणून युटोपियन शुगर्स येथे नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित केले आहे.कामगार कल्याण केंद्र मार्फत चालविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन ही आवळेकर यांनी केले.
सदर च्या शिबिरामध्ये सर्व कामगारांची नेत्र-चिकित्सा करण्यात आली.
फोटो ओळी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, व कामगार कल्याण केंद्र मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने युटोपियन शुगर्स येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन प्रसंगी दामाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ.निनाद नागणे,मोनाली ऑप्टिकलचे अशोक मगदुम,कामगार कल्याण केंद्र,मंगळवेढा प्रमुख सचिन आवळेकर,ग्रंथपाल टी.बी.माने कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे सह युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख,अधिकारी वर्ग, व कर्मचारी वर्ग दिसत आहेत.
=====================
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे



