👁 9 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये वेब डिझायनिंग स्पर्धा संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्येश काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात “वेब डिझायनिंग” ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हि स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


  सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड अभियांत्रिकी विभागात “वेब डिझायनिंग ची स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील द्वितीय वर्षातील ७० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या मध्ये विद्यार्थ्यांना वेबसाईट डिझाईन करायची होती दिलेल्या एका प्रॉब्लेम स्टेटमेंट वर विद्यार्थ्यांनी चार तासांमध्ये वेबसाईट डिझाईन तयार केली.


   ही स्पर्धा इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्स चाप्टर च्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. 

ही स्पर्धा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा


यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *