पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पंढरीत पत्रकार दिन उत्साहात साजरा
भारतीय राज्यघटनेने अतिशय विचारपूर्वक आपणास घटनात्म अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेले आहेत.त्यामाध्यामातून आपण अतिशय जबाबदार आणि कायद्याच्या चौकटीत राहून अभ्यासपुर्ण पत्रकारीता केली पाहीजे.आपल्या देशातील पत्रकारीतेचा इतिहास खुप जाज्वल्य आहे.आणि तो तितक्यास समपर्कपणे पत्रकरीतेच्या माध्यामातून मांडला गेला आहे.हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून जबाबदारीने पत्रकारीता केली पाहीजे असे प्रतिपादन न्या.पी.आर.देशमुख यांनी केले आहे.
पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती शाखा पंढरपूरच्या वतीने आयोजीत पत्रकार दिनानिमित्तच्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे,सोलापूर विद्यापिठाच्या वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर,प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.अभिजीत माचणूरकर हे उपस्थित होते.यावेळी विविध वृत्तपत्रांच्या कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर व फोटो ग्राफर यांचा ॠतज्ञता पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे म्हणाले की,आज पत्रकारीतेवर फार मोठी जबाबदारी येवून ठेपली असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होणारे मतमतांतरे अथवा बातम्या तपासून पाहताना वृत्तपत्रे याबाबत काय म्हणतात याकडेच वाचकांचा कल असतो.त्यामुळे वृत्तपत्रे ही प्रभावी आणि विश्वासू साधन म्हणुन पाहीली जातात.
यावेळी बोलताना डॉ.रविंद्र चिंचोलकर म्हणाले की,आज या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून ग्रामिण भागातील पत्रकारांना संघटीत करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनिय आहेत. आजची पत्रकारीता ही आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने अधिक वेगवान झाली आहे.पत्रकारीता करीत असताना आपण शब्दबध्द केलेली प्रत्येक बातमी ही समाजमनावर मोठा प्रभाव निर्माण करीत असते.समाजाला दिशा देण्याची ताकत लेखणीत आहे.
यावेळी पत्रकारीतेतील ताणतणाव आणि आरोग्य व्यवस्थापन या विषयावर बोलताना डॉ.अभिजीत माचणुकर यांनी आजच्या धकाधकीच्या जिवनात समाजमनाच्या प्रत्येक वेदना,समस्या,प्रश्न मांडण्यासाठी पत्रकार बांधवांनी आपल्या आरोग्यासाठी वेळ द्यावा व वेळेवर तपासणी करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळराव देशमुख म्हणाले की,इतिहास आणि वर्तमान यामधील ज्ञानाची दरी मिटविण्याचे काम वृत्तपत्रे आणि लेखनी करते.पत्रकारांनी चालू घडामोडींबरोबरच आपला अनुल्लेखीत जाज्वल्य इतिहासही प्रकट केला पाहीजे व यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहीजे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव,विविध सामाजिक संघटना,पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार सुुरक्षा समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com


