पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018
राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार जाहिर
सोलापूर दि.6 :- मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील शिवशक्ती महिला स्वयं सहाय्यता बचत गटास सन 2017-18 मधील जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार जाहिर झाला असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
सन 2017-18 साठी देण्यात येणाऱ्या जिल्हा व तालुका स्तरावरील राजमाता जिजाऊ पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्ताव पुरस्कार निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, नाबार्डचे अधिकारी व सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
पुरस्कारासाठी प्रात्प प्रस्तावांची छाननी करण्यात येवून जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिवशक्ती महिला स्वयंसहाय्यता बचत गट, नरखेड,ता.मोहोळ यांना प्रथम, तुळजाई महिला स्वयंसहाय्यता बचत गट, खंडोबाची वाडी, ता.मोहोळ यांना व्दितीय आणि धानेश्वरी महिला स्वयंसहाय्यता बचत गट, कुरघोट,ता.दक्षिण सोलापूर या गटास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. तर सन 2017-18 मध्ये स्वयंसहाय्यता बचत गटांना पत पुरवठ्याचे उद्दीष्ट पूर्ण केल्याबद्दल बँक ऑफ इंडिया, शाखा, चरे ता.बार्शी बँकेस उत्कृष्ट बँक पुरस्कार जाहिर झाला आहे.
तालुका स्तरावर राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार जाहिर झालेल्या बचतगटांची नावे अक्कलकोट -भाग्यलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह, करजगी प्रथम क्रमांक, जिजामाता महिला स्वयंसहाय्यता समूह, दहिटणेवाडी व्दितीय, विजयश्री महिला स्वयंसहाय्यता समूह, कर्जाळ, तृतीय , बार्शी – श्रीकृष्ण महिला स्वयंसहाय्यता समूह, कुसळंब प्रथम क्रमांक, कान्होपात्रा महिला स्वयंसहाय्यता समूह, जामगांव (आं) व्दितीय, ब्रम्हनाथ महिला स्वयंसहाय्यता समूह, बळेवाडी तृतीय, माढा – संजीवनी महिला स्वयंसहाय्यता समूह, टेंभुर्णी प्रथम क्रमांक, सृष्टी महिला स्वयंसहाय्यता समूह,टेंभुर्णी व्दितीय, सावित्री बाई फुले महिला स्वयंसहाय्यता समूह,मळेगांव तृतीय, मोहोळ – शिवशक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह, नरखेड जिल्हास्तर प्रथम/ तालुकास्तर प्रथम, तुळजाई महिला स्वयंसहाय्यता समूह, खंडोबाची वाडी जिल्हास्तर व्दितीय /तालुकास्तर व्दितीय, राणीलक्ष्मीबाई महिला स्वयंसहाय्यता समूह, अर्जुनसोंड तृतीय, करमाळा – शिवशंभो महिला स्वयंसहाय्यता समूह, सोगांव (ब) प्रथम, सरस्वती महिला स्वयंसहाय्यता समूह, लव्हे व्दितीय, माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह, सालसे तृतीय, पंढरपूर- राजमाता अहिल्या महिला महिला स्वयंसहाय्यता समूह, शेंगडेवाडी प्रथम, सावित्रीबाई फुले महिला स्वयंसहाय्यता समूह, शेटफळ व्दितीय, पिरसाहेब महिला स्वयंसहाय्यता समूह, पोहोरगांव तृतीय, मंगळवेढा – भिमाई महिला स्वयंसहाय्यता समूह,मरवडे प्रथम, चंद्रभागा महिला स्वयंसहाय्यता समूह, मरवडे व्दितीय, श्री बसवेश्वर महिला स्वयंसहाय्यता समूह, सलगर (बु) तृतीय, उत्तर सोलापूर – नागाताई महिला स्वयंसहाय्यता समूह, अकोलेकाटी प्रथम, इंदिरा महिला स्वयंसहाय्यता समूह, मार्डी व्दितीय, करूणा महिला स्वयंसहाय्यता समूह, डोणगांव तृतीय, सांगोला – मुक्ताई महिला स्वयंसहाय्यता समूह, मांजरी प्रथम, आदर्श महिला स्वयंसहाय्यता समूह, संगेवाडी व्दितीय, वैभवलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह, अकोला तृतीय, दक्षिण सोलापूर – धानेश्वरी महिला स्वयंसहय्यता समूह, कुरघोट जिल्हास्तर तृतीय / तालुकास्तर प्रथम, जाईजुई महिला स्वयंसहाय्यता समूह, टाकळी व्दितीय, स्वामी समर्थ महिला स्वयंसहाय्यता समूह, नांदणी तृतीय, माळशिरस – महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह, तांदुळवाडी प्रथम, नंदिनीदेवी महिला स्वयंसहाय्यता समूह, माळीनगर व्दितीय, पद्मजादेवी महिला स्वयंसहाय्यता समूह, चौडेश्वर वाडी तृतीय.
*******
व्याज सवलत योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर दि.6 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील कर्ज घेतलेल्या थकीत कर्जदारांना महामंडळाकडून 31 मार्च 2018 पर्यंत थकीत व्याज रकमेवर 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ संबंधित लाभार्थींनी येवून मुद्दल व व्याज रक्कम एक रक्कम भरणा करावी.
महामंडळामार्फत वितरीत केलेल्या व थकीत असणाऱ्या रकमेचा नुकताच आढावा घेण्यात आला. यामध्ये रूपये 3 कोटी 89 लाख 51 हजार रूपये थकीत असल्याचे दिसून आले. थकीत रक्कम लाभार्थी, त्यांचे जामिनदार हमीपत्र, पगारपत्र धारकांचे वेतनातून कपात, गहाणखत ( कर्ज बोजा नोंद उतारे ) इत्यादी आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमिन महसूल कायदा 1966 मधील तरतुदीनुसार आर.आर.सी इत्यादी अंतर्गत कार्यवाही करून वसुली करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
थकीत कर्जदारांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी थकीत रक्कम व व्याज मुदतीत भरून व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
*****
रास्तभाव दुकानातून धान्य
उचलण्याचे आवाहन
सोलापूर दि.6 :- सोलापूर शहरातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील धान्य मिळण्यास पात्र लाभार्थ्यांना याव्दारे आवाहन करणेत येते की दिनांक 07/01/2018 ते दिनांक 15/01/2018 या कालावधीत जास्तीत जास्त लाभधारकांनी रास्त भाव धान्य दुकानातून धान्याची उचल करावी असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
