👁 11 Views

श्री विठ्ठल फार्मसीच्या प्रा.एस.डी.सोनवणे यांना पी.एच.डी. प्राप्त



फार्मसीमध्ये पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल डॉ. एस.डी.सोनवणे यांचे स्वेरीच्यावतीने डॉ. एम.एम.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत डावीकडून प्रा. सतिश मांडवे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. जी.कुलकर्णी, डॉ.ए.ए.उत्पात, डॉ. प्रशांत पवार, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस. एन. कुलकर्णी, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे.

पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2018

पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. सविता दत्तात्रय सोनवणे यांना नुकतीच सोलापूर विद्यापीठाकडून फार्मसीमधील विषयात पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. ‘डिझाईन ऑफ टॉपिकल हर्बल मेडिकेशन फॉर द ट्रीटमेंट ऑफ गायनॅकॉलॉजिकल डीसऑर्डर’ या विषयावर त्यांनी आपला शोधप्रबंध विद्यापिठास सादर केला होता. त्यांच्या यशाबद्ल सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
           डॉ. पुरुषोत्तम राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा.एस.डी.सोनवणे यांनी पी.एचडी पूर्ण केली असून त्यांना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. जी.कुलकर्णी व फार्मसीच्या इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘डॉ. सोनवणे ह्या स्वेरीच्या फार्मसी महाविद्यालयात गेल्या ९ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत असून ‘घर आणि महाविद्यालय’ अशा दोन्ही जबाबदारी पार पाडत असताना संपादीत केलेली पी.एच.डी. पदवी विशेष महत्वाची वाटते.’ असे उदगार स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी डॉ. सोनवणे यांच्या सत्कारप्रसंगी काढले. संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा यांच्यासह इतर विश्वस्त, संस्थेंअंतर्गत असणाऱ्या डिप्लोमा इंजिनीअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, डॉ. एम.एम. पाटील यांच्यासह उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. सोनवणे यांचे अभिनंदन केले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *