👁 9 Views

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जमात प्रमाणपत्र पडताळणीकरिता विशेष मोहिम

पंढरपूर LIVE 20 Jun 2018

            मुंबईदि. 20 : राज्यात नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना  प्रवेशासाठी अनुसूचित जमात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विलंब होऊ नये म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आठ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत असून शैक्षणिक कारणांसाठी दाखल होणाऱ्या अर्जांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.
            या मोहिमे अंतर्गत अनुसूचित विद्यार्थ्यांना e-Tribe पोर्टलवर https://www.etribevalidty.mahaonline.gov.in ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी 9 ते 7 या कालावधीत 020-26360941 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
            
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या व त्यांचे कार्यक्षेत्र तसेच संपर्क दूरध्वनी खालीलप्रमाणे असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालक यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
अ.क्र
समितीचे ठिकाण
पत्ता व दूरध्वनी क्रमांक
कार्यक्षेत्र
1
पुणे
28क्वीन्स गार्डनपुणे-1
020-26336961
पुणेसांगलीसातारा,सोलापूर व कोल्हापूर
2
ठाणे
वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयवर्तकनगर,ठाणे (पश्चिम)ठाणे.
022-25883503
ठाणेमुंबईमुंबई उपनगर,रायगडरत्नागिरी व सिंधुदूर्ग
3
नाशिक
आदिवासी विकास भवनजुना आग्रा रोड,नाशिक-422002
0253-2577059
नाशिक व अहमदनगर
4
औरंगाबाद
सेंट लॉरेन्स हायस्कूलजवळटाऊन सेंटर सिडकोऔरंगाबाद
0240-2362901
औरंगाबादहिंगोलीपरभणी,जालनानांदेडबीडलातूर व उस्मानाबाद
5
अमरावती
शासकीय विश्रामगृहाजवळराज्य माहिती आयुक्त यांचे कार्यालयासमोरसना हाऊसजुना बायपास रोडचपराशीपुराअमरावती-444602
0721-2550995
अकोलाअमरावतीबुलढाणा,वाशिम आणि यवतमाळ
6
नागपूर
आदिवासी विकास भवनगिरी पेठनागपूर
0712-2560031
नागपूरवर्धाभंडारागोंदिया

7
नंदूरबार
शासकीय दूध डेअरीइमारतआरटीओजवळ,नंदूरबार
02564-210130
धुळेनंदूरबारजळगाव
8
गडचिरोली
जिल्हा परिषद कॉलनीकॉम्प्लेक्स,गडचिरोली-442605
07132-223179
गडचिरोली व चंद्रपूर
००००


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *