👁 10 Views

स्वेरीच्या डी फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद

पंढरपूर LIVE 22 Jun 2018


स्वेरीच्या डी फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद
पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.)क्र.- ६५०५ ची मान्यता मिळाली असून गुरुवार (दि २१  जून २०१८ ) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेस प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली. 
      डिप्लोमा (पॉलिटेक्निक) फार्मसी प्रथम वर्ष प्रवेश सन २०१८-१९ करीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई  येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६५०५)म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम,संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डी. फार्मसीचे१३ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची पंरपंरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशाकरिता बारावी सायन्स  परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया २१ जून २०१८  पासून ते १७ जुलै २०१८ सायं ५ वाजेपर्यंत चालणार  आहे. याचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डी. फार्मसी प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी मोबा.क्र ९९२१७६२७२८ व टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. मांडवे यांनी केले आहे. पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष ऑनलाईन रजिस्ट्रेशनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅसिलिटेशन सेंटर मध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *