👁 11 Views

पंढरपूर नगरपरिषदेची प्रभाग क्र. 10 ब ची पोटनिवडणुक बिनविरोध होण्याचे संकेत!

पंढरपूर LIVE 25 Jun 2018


नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी होणारी पोटनिवडणुक टळणार असल्याचे संकेत आज मिळाले आहेत. कारण या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार दि. 25 जुन रोजी संदीप पवार यांचे बंधु भैया उर्फ प्रदीप दिलीप पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणुक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रभाग क्र. 10 ब मधुन निवडून आलेले नगरसेवक संदीप पवार यांची हत्या झाल्यानंतर हे नगरसेवक पद रिक्त झाले असल्याने यासाठीची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली होती. या निवडणुकीसंदर्भात वेगवेगळे तर्क-वितर्कही सुरु होते. परंतु आज या चर्चेला आणि तर्क-वितर्कांना पुर्णविराम मिळाला असल्याचे संकेत दिसून येत आहेत.
   


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *