पंढरपूर LIVE 27 Jun 2018
सांगोला/प्रतिनिधी :
शहरातील सर्वच शासकीय प्रमुख कार्यालयामध्ये सी.सी.टी.व्ही.बसवावेत अशी मागणी शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने तहसिलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी कार्यालयात अधिकारी, कर्मचारी वेळेवर हजर नसतात. काही कार्यालयांमध्ये नको ते लोक कायद्याने काम करण्याऱ्या सक्षम अधिकाऱ्यांना दमदाटी करत असतात. तर काही कार्यालयात अधिकारी नको ते उद्योग करीत असतात व त्यांना तासन्तास बसवून घेत असतात. बेकायदेशीर कामे करण्याचे शासकीय कार्यालय अड्डेच बनले आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी लाखो रुपयांच्या हव्यासापोटी अशा लोकांना कार्यालयातून दिवसातून तीन-तीन चकरा होतात. त्यामुळे पुढारपण करणाऱ्यांची संस्था दिवसेंदिवस वाढली आहे. कोणत्याही पक्षाचे नाव सांगून कार्यालयात काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. गावाबाहेरील असणाऱ्या शासकीय, निमशासकीय कार्यालयात बेसुमार नको ते उद्योग चालू आहेत त्यासाठी सांगोला पोलीस स्टेशन, सांगोला नगरपालिका, दुय्यम निबंधक, सहकार निबंधक, कृषी विभाग, सांगोला पंचायत समिती, गाव कामगार तलाठी कार्यालय, वीज बोर्ड शहर आणि ग्रामीण, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे, ग्रामीण रुग्णालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बालप्रकल्प विकास विभाग अधिकारी, उपकोषागार कार्यालय, उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, वखार महामंडळ, टेंभू म्हैसाळ प्रकल्प कार्या 1 व 2 आदी प्रमुख शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तात्काळ बसविणेची गरज आहे. त्यामुळे कार्यलयीन कामकाजात सुसुत्रता येवून भ्रष्टाचारास आळा बसेल.
विविध खात्यांचे अकरा अधिकारी व पदाधिकारी, कर्मचारी यांना लाचलुचपत खात्याने गेल्या काही महिन्यात यांनी रंगेहाथ पकडले आहे. तालुक्यात याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याठिकाणी सर्वत्र सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावेत अशी मागणी शहरवासियांतून संघटनेने केली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com