👁 10 Views

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या बैठकीत घेतला विकास कामांचा आढावा… विकासाला गती द्या, अडथळा आणणार्‍याविरूद्ध कठोर कारवाई करा, कामचुकारपणा करू नका खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मॅरेथॉन बैठकीत केल्या सूचना

पंढरपूर LIVE 27 Jun 2018

   
परळी वैजनाथ दि. 26 ….
      केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने जिल्ह्य़ात विविध विकास कामे सुरू आहेत त्या कामांना आणखी गती द्या, परळी – बीड – अहमदनगर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे, विकासाच्या कामात अडथळा आणणार्‍याची गय करू नका अशा सूचना देऊन पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीत असे सांगून या कामांमध्ये कुणाचाही कामचुकारपणा सहन केला जाणार नाही असा ईशारा खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दिला. चांगले काम करणार्‍या अधिकारी, पदाधिकारी यांचे त्यांनी कौतुकही केले. या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. 
      बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची मॅरेथॉन बैठक घेऊन जिल्ह्य़ात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीला जि. प. अध्यक्षा सविताताई गोल्हार, आमदार आर. टी. देशमुख, आ. प्रा. संगिताताई ठोंबरे, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जि. प. चे मुख्य कार्यकारी अमोल येडगे, निवासी जिल्हाधिकारी सुर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालिका संगीता पाटील, दिशा समितीचे अशासकीय सदस्य सलीम जहांगीर, प्रतिभा सुरवसे, रमेश मुंडे, रंजना नागरे, यांच्यासह पं. स. सभापती, न. प. अध्यक्ष आदी उपस्थित होते. 
      पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी विकास कामांच्या विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून ग्रामीण व शहरी भागात अनेक कामे सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे विकास सामान्य जनतेच्या दारापर्यंत पोहंचविण्याचे स्वप्न आता पूर्णत्वास येत असल्याचे सांगून जनतेला योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये केंद्र व राज्य सरकार राबवित असलेल्या विविध योजनांचा सामन्यांना फायदा झाला पाहिजे अशा सूचना खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दिल्या. तसेच बीड शहरातील घाणीच्या विषयावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. बीड हे जिल्ह्याचे ठिकाण आहे, येथे येणार्‍यांची संख्या मोठी आहे त्यामुळे येथील स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून न. प. चे मुख्याधिकारी यांना कडक शब्दात सूचना दिल्या. पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते, नाल्या खोकल्याने जनतेचे होणारे हाल थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 
       या बैठकीत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, दीन दयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, दीन दयाळ ग्रामीण कौशल्य योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, टेलिकॉम, रेल्वे आदींसह अनेक योजनांचा आढावा घेण्यात आला. जी कामे संथ गतीने सुरू आहेत त्यांना वेग देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
* विनाकारण अडथळा आणणार्‍याची गय नाही*
     परळी – बीड – नगर रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे मात्र या कामात काही ठिकाणी राजकीय हेतूने विनाकारण अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. विकासाच्या कामात कोणी अडथळा निर्माण करीत असेल तर तो कुणीही असो त्याची गय करायची नाही, अशा लोकांवर कठोर कारवाई करा, रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण झालेच पाहिजे अशा कडक सूचना खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दिल्या. 
* वृक्षारोपण कार्यक्रमात विक्रम करा *
      येत्या 1 जुलैपासून वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत बीड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होईल असे काम सर्वांनी मिळून करावे. वृक्ष लागवड करताना लोकप्रतिनिधींना सोबत घ्या, शाळांच्या परिसरात वृक्षारोपण करून झाडांची जबाबदारी लहान मुलांवर, झाडे लावण्याचा केवळ दिखावा करू नका अशा सूचना खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दिल्या. 
      यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यासनियुक्त सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. जिल्हाधिकारी ए. डी. सिंह यांनीही अधिकार्‍यांना कडक सूचना देऊन विकास कामांना गती देण्याच्या सूचना केल्या.


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *