👁 9 Views

खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

 

पुणे; वारजे भागातील हॉटेल व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने उत्तमनगर परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.


सुभाष अशोक सहजराव आणि बाळासाहेब हरिभाऊ लोणारे (रा. कुडजे, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी आपण एका पक्षाशी निगडित असल्याचेही ओळख फिर्यादी यांना करून दिली होती. 


वारजे माळवाडी भागातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या विरोधात पुणे महानगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल करण्याची धमकी आरोपी सहजराव आणि लोणारे यांनी दिली होती.

त्यानंतर आरोपींनी हॉटेल व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत हॉटेल व्यावसायिकाने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.


 खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, सैदाबा भोजराव, अमोल पिलाणे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे आदींनी शिवणे भागात सापळा लावून दोघांना पकडले. सहजराव आणि लोणारे यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *